सर्वात मोठ्या दिवसाचा योग

By Admin | Updated: June 21, 2016 01:46 IST2016-06-21T01:46:59+5:302016-06-21T01:46:59+5:30

२१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात

The sum of the biggest days | सर्वात मोठ्या दिवसाचा योग

सर्वात मोठ्या दिवसाचा योग

१४ तासांचा दिवस : आज सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत
सालेकसा : २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो. २१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते.
खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायन होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते.
पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जूननंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात.
२१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायन क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो, नंतर काही भाग निरकस दिशेत येतो. त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो. पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना देशांश म्हणतात. मधोमध शून्य अंशावरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशावर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर अर्काटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून या वेळी प्रचंड तापमान वाढलेले असते.

भारतात वेळेचे निर्धारण
४पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक देशांश रेखांपैकी ८२(१/२) अंशावरील देशांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील देशांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते.

२१ जून आणि योग दिवस
४२० आणि २१ जून आपल्या पृथ्वीसाठी फार महत्वाचे दिवस आहेत. यांचा सरळ संबंध पृथ्वी आणि सूर्याशी असतो. या दिवशी सूर्य किरणांनी उष्ण कटिबंधातील अंक्षाशांवर सरळ प्रभाव पडतो. एकीकडे प्रचंड उन्हाळा तर दूसरीकडे प्रचंड हिवाळा, असा प्रभाव पडतो. २१ जूनला योग केल्यास सूर्याचा मोठा प्रभाव मानवी शरीरावर पडत असतो. भारतीय योग शास्त्राप्रमाणे २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होणे साधना पद आणि डिसेंबरपासून उत्तरायण होणे ज्ञान पद मानले जाते. १८ ते ४८ डिग्री तापमानात राहणाऱ्या लोकांवर २० आणि २१ जूनच्या दिवसाचा मोठा प्रभाव पडतो. याचा अभ्यास करून संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून योग दिवस साजरा करण्याची स्वीकृत्ती दिली आहे.

Web Title: The sum of the biggest days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.