देवरी येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:15+5:302021-04-22T04:30:15+5:30
देवरी : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीत पूर्ण देशासह राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शासनाकडे रक्तसाठ्याचा अभाव ...

देवरी येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी आयोजन
देवरी : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीत पूर्ण देशासह राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शासनाकडे रक्तसाठ्याचा अभाव आहे. अशात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार समाजहिताकरिता राज्यातील प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरांवर रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अनुषंगाने आमदार सहषराम कोरोटे यांच्या मार्गदर्शनात आमगाव आणि सालेकसा येथेही रक्तदान शिबिर घेण्यात आले.
देवरी येथे जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात मंगळवारी (दि. २०) भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आमगाव, सालेकसा व देवरी या तालुक्यांच्या ठिकाणी एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्याची तिन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात प्रशंसा केली जात आहे. देवरी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. रक्तदान शिबिराला देवरीचे उपविभागीय अधिकारी सिरसाट, तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलदार ठाकरे, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडिया, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्रा अगडे, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, काँग्रेस किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष जीवन सलामे, देवरी तालुका तलाठी संघाचे पदाधिकारी यांनी भेट देऊन रक्तसंकलन करण्यात सहकार्य केले. शिबिरासाठी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबलू कुरैशी, शहराध्यक्ष कुलदीप गुप्ता, अविनाश टेंभरे, सिरपूरचे सरपंच नीतेश भांडारकर, फुटाण्याचे सरपंच नूतन बन्सोड, भर्रेगावचे उपसरपंच जयेंद्र मेंढे, युवक काँग्रेसचे पाशाभाई सैय्यद, राज भाटिया, पिंचू भाटिया, नरेश राऊत, रोशन भाटिया, सचिन येळे, नामदेव आचले, शार्दूल संगीडवार, कमलेश पालीवाल, राजेश शाहू, संदीप मोहबीया यांनी सहकार्य केले.