आंदोलनाची यशस्वी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:13 IST2018-06-24T22:11:16+5:302018-06-24T22:13:15+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने राणी दुर्गावती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भाकप तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.

आंदोलनाची यशस्वी सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने राणी दुर्गावती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भाकप तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.
सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालय व पंचायत समितीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार टी.टी. बिसेन व खंड विकास अधिकारी हिरूडकर यांना निवेदन दिले.
निवेदनात जीवघेण्या महागाईचा विरोध, ग्रामीण, गरीब, दलित, आदिवासी, शेतमजूर, शेतकरी, अतिक्रमण करणारे भूमिहिन, बेघर व निराधारांच्या मागण्यांचा समावेश आहे. तसेच मागील महिन्यात जिल्हा विकास निधी अंतर्गत जि.प. व पं.स. द्वारे बांधलेल्या दुकान गाळे वाटपात आर्थिक व्यवहार करून गैरप्रकार करण्यात आला व पक्षपात करून गाळे वाटप करण्यात आलेल्या कारभाराची योग्य व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई सतत वाढत आहे. गॅस, पेट्रोल, डीझेल, एसटीचे भाडे, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच असून नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, निराधारांना एक हजार रूपये पेंशन देवू, भूमिहिन अतिक्रमण धारकांची तीन महिन्यांच्याआता त्रुटी पूर्तता करून सहा महिन्यांत त्यांना पट्टे देवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ६ मार्च रोजी दिले होते. मात्र यावर अद्याप अंमजबजावणी करण्यात आली नाही.
त्यामुळे सदर मागण्यांची महाराष्ट्र शासनाने त्वरित पूर्तता करावी. त्यासह निराधारांना प्रत्येक महिन्यात तीन हजार रूपये मानधन देण्यात यावे व त्यांच्यासाठी कायदा करावा. बेघरांना तीन लाख रूपये घर बांधण्यासाठी द्यावे. सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली, त्यांना अजूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. त्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी बाबुराव राऊत होते. संचालन शंकर बिंझलेकर यांनी केले. आभार शालीकराम घासले यांनी मानले. धरणे आंदोलनासाठी संजय लांडेकर, घनश्याम फाफनवाडे, राम किशन, हिरामन कोरे, ज्ञानिराम मेंढे, आत्माराम रहिले, प्रेमदास चौरे, रेखा ताराम यांनी सहकार्य केले.