विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:14+5:302021-02-05T07:49:14+5:30
गोंदिया : आपल्याला खूप संधी व वाव आहे. परंतु आपण तिथेच कमी पडतो तेव्हा आपण संधीच सोनं करीत नाही. ...

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे
गोंदिया : आपल्याला खूप संधी व वाव आहे. परंतु आपण तिथेच कमी पडतो तेव्हा आपण संधीच सोनं करीत नाही. आपण आपले सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करावा व मिळालेल्या संधी सोने करावे असे प्रतिपादन पोलीस विभाग गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम यांनी केले.
विदर्भ बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेंतर्गत जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणाऱ्या उडान क्रीडा व करिअर अकॅडमीच्यावतीने एसएससी, जीडी, एसएसबी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अतुल सतदेवे होते. मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव नागपुरे, संस्थेचे सचिव सुषमा माने, दिनेश डोंगरे, क्रीडा संस्था संचालक छोटू रहांगडाले, सचिव रितुराज यादव, सचिव स्नेहदीप कोकाटे, सचिव टोपेश सावरकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रियंका मेश्राम यांनी, मनात जिद्द असली व चिकाटीने प्रयत्न केल्यास प्रतिकूल परिस्थितीवर ही मात करता येऊ शकते असे मत व्यक्त केले. सतदेवे यांनी, विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केल्यानंतर आपले सामाजिक कर्तव्य व राष्ट्रभावना विसरु नये. कोणत्याही क्षेत्रात जरी असले तरी त्यांनी समाज व राष्ट्रहितासाठी झटले पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या खुशबू चिखलोंडे, किरण कुराहे, संदीप गाते, प्रशांत लिल्हारे, शुभम बैरण, अनिल बोळणे यांना अकॅडमीकडून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संचालन रोशनी शेंडे यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. विनोद माने यांनी मानले. कार्यक्रमासाठी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.