मंजुरीनंतरही ३१ शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

By Admin | Updated: October 23, 2016 01:43 IST2016-10-23T01:43:45+5:302016-10-23T01:43:45+5:30

गोंदिया जिल्ह्यातील ३१ संस्थांना यावर्षी राज्य शासनाने स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्याची परवानगी दिली.

Students do not have access to 31 schools even after sanction | मंजुरीनंतरही ३१ शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

मंजुरीनंतरही ३१ शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ३१ संस्थांना यावर्षी राज्य शासनाने स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. शाळेचा दर्जावाढ करण्याचीही परवानगी देण्यात आली. ‘लोकमत’ने सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने तीन वर्षानंतर हा निर्णय घेतला. परंतु त्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालकांकडून मान्यता न मिळाल्याने तसेच शिक्षण विभागाची प्राथमिक मान्यताही न मिळाल्याने त्या शाळांना यावर्षी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहावे लागले.
स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा यथास्थितीत, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दर्जावाढ करणे, त्याकरीता अर्ज मागविणे, परवाणगी देणे, शैक्षणीक सत्र २०१३-१४ पासून मान्यता देण्यात आली. सीबीएसई, आयसीएसई, आयबी,आयजीसीएसई आणि सीआयई इत्यादी शिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमाशी संलग्नीत होण्यास इच्छुक असणाऱ्या इंग्रजी माध्यामांच्या शाळांना कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील ३१ शाळांना मान्यता देण्यात आली आहे.
लोकमतच्या सतत पाठपुराव्यामुळे राज्यातील ४२३६ पैकी १०८५ शाळांना पात्र ठरविण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्यातील ३१ शाळांचा समावेश आहे. यासंदर्भात २ जून २०१५ रोजी शासनाने हे जाहीर केले. शैक्षणीक सत्र २०१५-१६ या वर्षाकरीता मान्यता देण्यात आली. परंतु शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षणाधिकारी यांच्या कडून परवानगी न मिळाल्याने या ३१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही.
स्वयंअर्थसहाय्यित असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील आर.के.पब्लिक स्कूल मु.पो. नागरा ता.गोंदिया जि.गोंदिया, माँ शारदा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ता. जि. गोंदिया, श्रीमती भागेरतीबाई आत्मारामजी डोंगरवार इंग्रजी प्राथमिक शाळा नवेगावबांध, ता. अर्जुनी-मोरगाव, आदिशक्ती पब्लिक इंग्लिश स्कूल काचेवानी ता.तिरोडा, प्रेसिडेंसी पब्लिक स्कूल बिरसी, पो.दासगाव ता.गोंदिया, मातोश्री सोनाबाई गोस्वामी इंग्लिश स्कूल तेढा ता. गोरेगाव जिल्हा गोंदिया, डॉ.राधाकृष्ण कान्व्हेंट कनेरी/केशोरी, ता. अर्जुनी-मोरगाव, लिटल फ्लावर्स अकादमी मलपुरी तिरोडा, युवराज तुरकर उच्च प्राथमिक स्कूल कासा पो.काटी, ता. गोंदिया, संस्कार ज्युनिअर कॉलेज कामठा ता.गोंदिया, जी.ई.एस. मनोहरभाई पटेल प्राथमिक शाळा गोंदिया एम.आई.ई.टी. परिसर कुडवा गोंदिया, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल चुलोद रोड (गोंदिया), प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कुल चुलोद रोड, चुलोद (गोंदिया), क्रेसेंट इंग्लिश कॉन्व्हेंट नंदननगर ता.तिरोडा, मुक्त जीवन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सायन्स आसोली, ता. गोंदिया यांचा समावेश आहे.
तसेच तिरोडा तालुक्यात विदर्भ पब्लिक स्कूल नवेझरी आदर्श भारत पब्लिक स्कूल हिवरा, ता.गोंदिया, आर.के.पब्लिक स्कुल नागरा, ता. गोंदिया, शहीद संजय पटले पब्लिक स्कुल तिरोडा, श्री छत्रपती शिवाजी राजे पब्लिक स्कूल गोंदिया, माऊंट कामेट पब्लिक स्कूल, ठाणा रोड, गोरेगाव, एपीजे फुतुरा स्कूल आमगाव खुर्द, हारीझोन इंग्लिश स्कूल मु.चुलोद,ता.गोंदिया, अभिनव विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रोंढा, ता.सालेकसा, पोद्दार इंटरनॅनशल स्कूल हिवरा, ता.गोंदिया, साकेत ज्युनिअर कॉलेज आॅफ कॉमर्स बजाज नगर, फुलचूर रोड, गोंदिया, गवराबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय झालीया ता.सालेकसा, श्रीमती भागीरथीबाई आत्मारामजी डोंगरवार ज्यु.विज्ञान महाविद्यालय नवेगावबांध, ता.अर्जुनी-मोरगाव, छत्रपती विद्यालय सितेपार सितेपार, ता.आमगाव, एक्युट पब्लिक स्कूल कटंगीकला ता.गोंदिया, लिटील फ्लावर्स सायन्स व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज मामा चौक विवेकानंद कॉलनी गोंदिया या ३१ शाळांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Students do not have access to 31 schools even after sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.