बायोमेट्रिक हजेरीमुळे विद्यार्थी, शिक्षकांची डोकेदुखी वाढणार

By Admin | Updated: August 17, 2015 01:46 IST2015-08-17T01:46:52+5:302015-08-17T01:46:52+5:30

सध्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन सरल फार्म भरणे डोकेदुखी ठरत असताना पुन्हा शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हजेरी ...

Students and teachers will get headache due to presence of biometric attendance | बायोमेट्रिक हजेरीमुळे विद्यार्थी, शिक्षकांची डोकेदुखी वाढणार

बायोमेट्रिक हजेरीमुळे विद्यार्थी, शिक्षकांची डोकेदुखी वाढणार

कोंढा (कोसरा) : सध्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन सरल फार्म भरणे डोकेदुखी ठरत असताना पुन्हा शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हजेरी लावण्यासाठी शासनाने हालचालींना सुरुवात केली असल्याने पुन्हा शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्षी बायोमेट्रिक प्रणाली अमलात येऊ शकेल, यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे वारेमाप अनुदान लाटणाऱ्या शाळा व संस्थाचालकांना चाप बसणार आहे.
राज्यात २०११ मध्ये गटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अनेक शाळांनी अनुदान लाटण्यासाठी खोटे विद्यार्थी दाखविल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. विद्यार्थी सरल फॉर्मद्वारेदेखील बोगस विद्यार्थी समोर येणार आहे.
बायोमेट्रिक शाळांमध्ये हजेरीसाठी लावण्यात येईल. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद करण्याची सोय केली जाईल. नंतर या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात येईल. शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण हाती घेतले. त्याचा एक भाग म्हणून नव्याने अनेक योजना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी, आधार क्रमांक अशा बाबी झाल्या की पुढील वर्षापासून बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी होईल. म्हणून सध्या विद्यार्थ्यांची नोंदणी आॅनलाईन सरल फार्मद्वारे केली जात आहे.
तसेच प्रत्येक शाळेत सर्व वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले की नाही याची माहिती मागविली जात आहे. सध्या प्रत्येक शाळामध्ये अध्यापनाचे काम कमी आणि विद्यार्थ्यांचे सरल, आधार अशी माहिती जमा करण्यात शिक्षकांचा वेळ जात आहे. पुन्हा शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरु झाल्यानंतर शिक्षक, विद्यार्थी यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Students and teachers will get headache due to presence of biometric attendance