सालेकसा येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:24+5:30

सालेकसामध्ये व्यापारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. ही शहरासाठी मोठी चिंतेची बाब आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास ५ हजार लोक बाधित झाले आहेत. सालेकसा तालुक्यात १६० कोरोना बाधित आढळले आहेत. ३ लोकांचा मृत्यू ही झाला आहे.

Strictly closed at Saleksa | सालेकसा येथे कडकडीत बंद

सालेकसा येथे कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देजनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद : मेडिकल व बँक सुरु असून ही शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा शहरातील नागरिकांनी व्यापारी संघाच्या सहकार्याने ६ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. ६ दिवसीय जनता कर्फ्यूच्या बुधवारी (दि.२३) पहिल्या दिवशी सालेकसा येथे कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. त्यात सालेकसा शहरासह संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान सालेकसामध्ये व्यापारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. ही शहरासाठी मोठी चिंतेची बाब आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास ५ हजार लोक बाधित झाले आहेत. सालेकसा तालुक्यात १६० कोरोना बाधित आढळले आहेत. ३ लोकांचा मृत्यू ही झाला आहे. मृत्यू झालेल्यापैकी एक माजी सरपंच तर दुसरा विद्यमान उपसरपंच आणि तिसरा इंजिनियर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेले तिन्ही कोरोना बाधित ३० ते ५० मधातील वयोगटातील आहेत. सुरुवातीला तालुक्यातील ग्रामीण भागातच कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु आता सालेकसा शहरात १० ते १५ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गावकरी चिंतेत आहे. किमान ६ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशाचे पालन करीत शहरातील बाजारपेठेतील आणि सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली. २३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंतच्या जनता कर्फ्यू कठोरतेने पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.


बँकेतील गर्दी झाली कमी
६ दिवसीय जनता कर्फ्यूमध्ये बँका, मेडिकल स्टोअर्स, सरकारी व खासगी दवाखाने सुरु ठेवण्याची सुट देण्यात आली. मात्र यावेळी बँकांमध्ये बाहेरुन येणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी झाली होती. कर्मचाऱ्यांनी आतूनच कामकाज चालविला तसेच कामाच्या वेळा सुद्धा कमी करण्यात आल्या आहे.

दारु दुकानांना सुद्धा पूर्ण ६ दिवस बंद पाडण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यांना ३ दिवसांपेक्षा जास्त बंद ठेवता येत नव्हते. त्यामुळे उर्वरित ३ दिवस दुपारच्या वेळेत फक्त काही वेळेसाठी दारु दुकाने सुरु ठेवण्याची सुट देण्यात आली आहे. ते ही फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याच्या अटीवर.
-राजेन्द्र बागळे, पोलीस पाटील, आमगाव खुर्द
.
पोलीस स्टेशनच्यावतीने सालेकसा येथील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दिवसभर येण्या-जाणाºयांवर नजर ठेवत मास्क घालण्यासाठी सक्ती केली जात आहे. तसेच जनता कर्फ्यूचे शांततेत पालन करावे यासाठी प्रयत्न करुन सहकार्य केले जात आहे.
-राजकुमार डुणगे, ठाणेदार सालेकसा.

Web Title: Strictly closed at Saleksa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.