समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहातून विवाह व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:42 IST2019-04-20T21:41:31+5:302019-04-20T21:42:02+5:30
आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे.

समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहातून विवाह व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे. सामूहिक विवाह विवाहाच्या माध्यमातून नवयुगलांच्या परिवारांना आर्थिक मदत मिळत असतानाच समाजाला एकसुत्रात बांधण्याची संधीही मिळते. त्यामुळे समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहांतून विवाह व्हावे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोरेगाव येथे आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सामूहिक विवाह सोहळ््यांचे आयोजन सर्व धर्म व जातींनी करावे. समृद्ध व गरीब सर्व युगल व त्यांच्या परिवारांनी सामाजीकतेला वाव देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ््यांतच विवाह करण्याची परंपरा कायम करावी असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आमदार रामरतन राऊत, जी.आर.राणा, सीमा मडावी, भरत बहेकार, टोलसिंग पवार, माधुरी टेंभरे, किसन मानकर, अजमन रावते, झामसिंग बघेले, लिना बोपचे, बि.के.गावराणे, श्रावण राणा, अॅड.के.आर.शेंडे, प्रल्हाद भोयर, उषा मेंढे, शिवलाल गावड, तारण राऊत, आशिष बारेवार, पुरूषोत्तम कटरे, मनीराम मडावी, अमर वºहाडे, एस.एच.फुनसे, अर्चना राऊत, लक्ष्मीकांत बारेवार, डी.आर.गाते, पी.जी.कटरे, ओ.एस.जमदाळ, भोजराज चुलपार, डॉ.दिलीप लटये, विजय राणे, सुरेश रहांगडाले यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.
२७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’
आदिवासी हलबा-हलबी समाजाच्यावतीने मागील २१ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ््याची ही परंपरा सुरू आहे. यंदा या विवाह सोहळ््यात २७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ समाजबांधव व पाहुण्यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आले.