साकोलीत काँग्रेसचा रास्ता रोको
By Admin | Updated: February 11, 2015 01:32 IST2015-02-11T01:32:03+5:302015-02-11T01:32:03+5:30
जनतेच्या विविध मागणीला धरून साकोली तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी आमदार सेवक वाघाये व तालुकाध्यक्ष मार्कंड भेंडारकर यांच्या नेतृत्वात...

साकोलीत काँग्रेसचा रास्ता रोको
साकोली : जनतेच्या विविध मागणीला धरून साकोली तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी आमदार सेवक वाघाये व तालुकाध्यक्ष मार्कंड भेंडारकर यांच्या नेतृत्वात साकोली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धानाची निर्यात पूर्ववत करून धानाचे भाव वाढवून बोनस द्यावा, भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, साकोली तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावा, धानाला पाचशे रुपये बोनस देण्यात यावे, साकोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम बंद करण्यात यावे या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनात शहर अध्यक्ष अश्विन नशिने, विजू दुबे, बाळा शिवणकर, संतोष दोनाडकर, माया मेश्राम, निर्मला कापगते, उमेश भुरे, प्रकाश करंजेकर, नरेश बेलेकर, गुलाब कापसे, विजय साखरे, डॉ.निमराज कापगते, आनंद नंदागवळी, वसंता हटवार, जितेंद्र मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)