शेतकºयांचे ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:54 IST2017-08-04T00:53:16+5:302017-08-04T00:54:04+5:30
देशव्यापी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आवाहनानंतर बुधवारी राणी दुर्गावती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकºयांचे ‘रास्ता रोको’
लोकमत न्यूज नेटवर्क
ैदेवरी : देशव्यापी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आवाहनानंतर बुधवारी राणी दुर्गावती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे वरिष्ठ नेते शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात भर पावसात शेतकºयांनी आंदोलन यशस्वी केले. महाराष्टÑ राज्य किसान सभा तालुका कौन्सिलच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनापूर्वी राणी दुर्गावती चौकात बाबुराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली. सभेला शेतकरी-शेतमजुरांचे वरिष्ठ पुढारी शेखर कनोजिया, महादेवराव लांडेकर, गणेश बिंझलेकर, मोहम्मद नईम शेख यांनी संबोधित केले. अध्यक्षीय भाषणातून झालेल्या आवाहनानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यानंतर संघटनेच्या १३ सदस्यीय प्रतिनिधी मंडळाच्यावतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी (महसूल) विजय बोरूंडे यांना व त्यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन पाठविण्यात आले.
दिलेल्या पत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एकरपर्यंतच्या लहान शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परंतु कोणत्या शेतकºयांचे कर्ज माफ झाले, याची यादी कोणत्याही बँकेत किंवा तहसील कार्यालायमध्ये लावण्यात आली नाही ती सूची तात्काळ लावण्यात यावी, शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या आधारावर ५० टक्के नफा देण्यात यावा स्वामीनाथन आयोगाचे अहवाल शेतकºयांच्या हितासाठी लागू करा. देवरीसह गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा. तसेच लहरी पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले, त्याची भरपाई द्या, सावकारांचे शेतकºयांवरील सर्व कर्ज माफ करा, कर्जासाठी त्रस्त करणाºया सावकारांवर कठोर कारवाई करा, शेतकºयांना शेतीसाठी लागणारे कीटकनाशक औषधी, खत व औजारे स्वस्त दरात वितरित करा, शेतकºयांना बनावटी बियाणे देणाºया एजंट व कंपनीवर कठोर कारवाई करा, तसेच ६० वर्षांवरील शेतकºयांना तीन हजार रूपये मासीक पेंशन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.
सदर रास्ता रोको आंदोलनात शंकर बिंझलेकर, बाबुराव राऊत, रेखा ताराम, नाशिका सरजारे, मोतीराम कोराम, फागुराम मानकर, सुक्षकला नंदागवळी, शारदा उईके, अशोक साखरे व कार्यकर्ते उपस्थित होते.