तिरोड्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By Admin | Updated: April 28, 2017 01:45 IST2017-04-28T01:45:38+5:302017-04-28T01:45:38+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडाच्या वतीने गोंदिया मार्गावरील चंद्रभागा नाका येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह

Stop the path of the NCP in Tirodaya | तिरोड्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

तिरोड्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व विविध मागण्या
तिरोडा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडाच्या वतीने गोंदिया मार्गावरील चंद्रभागा नाका येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी आ.राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, नरेश माहेश्वरी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
याप्रसंगी शेतकरी कसा लुबाडला जात आहे, हे सरकार शेतकऱ्यांचे मित्र नसून शत्रू आहेत. शेतकऱ्यांना विविध प्रकारे नाडवल्या जात आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन दिलीप बन्सोड, प्रेम रहांगडाले, डॉ.अविनाश जायस्वाल, जि.प. सदस्य कैलाश पटले यांनी केले. याप्रसंगी राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी यांनीही सरकारवर कडाडून हल्ला चढविला.
यावेळी पं.स. सदस्य निता रहांगडाले, भरत मलेवार, डोमळे, न.प. सभापती नरेश कुंभारे, न.प. सदस्य अजय गौर, शिशुपाल पटले, हितेंद्र जांभुळकर, शिशुपाल पटले, विलास मेश्राम, संजय चंद्रीकापुरे, पंचायत समिती सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, नितेश खोब्रागडे, पंचम बिसेन, गुड्डू कटरे, हेमंत हट्टेवार, संजय किंदरले, रामकुमार असाटी, जि.प. सदस्या सुनिता मडावी, माजी न.प. उपाध्यक्षा ममता बैस, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सदस्या जया धावडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या आंदोलनप्रसंगी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे संचालन जागेश निमजे यांनी केले. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भावनेने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी बांधव आले होते. या आंदोलनामुळे काही काळ गोंदिया तिरोडा मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. हे आंदोलन शांततामय मार्गाने करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Stop the path of the NCP in Tirodaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.