बीजीडब्ल्यू रुग्णालयात रुग्णांची होणारी दिशाभूल थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:58+5:302021-03-07T04:25:58+5:30
तिरोडा : गोंदिया येथील गंगाबाई रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या धुरपता भेलावे यांना शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रुपये तर औषधांकिरता २०२३ रुपये ...

बीजीडब्ल्यू रुग्णालयात रुग्णांची होणारी दिशाभूल थांबवा
तिरोडा : गोंदिया येथील गंगाबाई रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या धुरपता भेलावे यांना शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रुपये तर औषधांकिरता २०२३ रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची दिशाभूल करून पैसे घेण्याचा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून गंगाबाई महिला रुग्णालयात १४ फेब्रुवारी २०२१ ला रात्री प्रसूतीसाठी दाखल झालेल्या धुरपता भेलावे यांचे राजेश भेलावे यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच गरीब रुग्णाकडून उपचारासाठी घेतलेले पैसे परत करण्यात यावेत. विषेश म्हणजे धुरपता भेलावे यांची रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी वाहनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही. अलीकडे या रुग्णालयात असे प्रकार अनेकदा घडले असून, या प्रकारांना त्वरित पायबंद लावण्याची मागणी वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून महेंद्र भांडारकर यांनी केली आहे.