रेल्वेतून दागिने चोरणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: September 11, 2015 02:14 IST2015-09-11T02:14:19+5:302015-09-11T02:14:19+5:30
बल्लारशहा ते गोंदिया रेल्वे गाडी क्र. ५८८०९८ ही गाडी सौंदड येथून सुटताच गोंदियाच्या रेलटोली येथील ...

रेल्वेतून दागिने चोरणाऱ्यांना अटक
गोंदिया : बल्लारशहा ते गोंदिया रेल्वे गाडी क्र. ५८८०९८ ही गाडी सौंदड येथून सुटताच गोंदियाच्या रेलटोली येथील हनुमान मंदिराजवळील अर्चना हेमंत शहारे (२७) यांच्या जवळील पर्समधून २४ हजार ३५० रूपयांचे दागिने पळविल्यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी बिहार येथील रहिवासी आहेत. राकेशकुमार प्रमोदसिंग (२७) व अजयकुमार जयलाल मंडल (३२) दोन्ही रा.गोविंदपूर जि.खगरीया बिहार अशी त्यांची नावे आहेत.
त्या दोघांनी पळविलेला पर्समधील पोत, कानातील दागिने, ३९ मनी, अडीच ग्रॅम वजनाचे रिंग, चांदीच्या तोरड्या व एक जोडी जोडवे असा एकूण २४ हजार ३५० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाच मद्यपी वाहन चालकावर गुन्हा दाखल
गोंदिया : आमगाव तालुक्याच्या भजीयापार येथील तामेश्वर सुनाम पंधरे (३१) याने मद्य प्राशन करून मोटारसायकल रस्ताभर चालवित असताना त्याला पोलिसांनी अदासी येथे पकडले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
खमारी बसस्थानकावर आमगावच्या कुंभारटोली येथील सतीश दुलीचंद डोंगरे (२५) हा सुध्दा मद्याच्या धुंदीत वाहन चालवित असताना त्याही पकडण्यात आले. खमारी येथील मुकेश भैय्यालाल मेंढे (२२) यालाही मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना अटक करण्यात आली. गंगाझरी पोलीसांनी लोधीटोला येथील प्रितीलाल लष्मण दिहारी याला ओझीटोला येथे बुधवारच्या रात्री ८ वाजता दरम्यान मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना त्यालाही पकडण्यात आले.
मद्यपी वाहन चालकावर गुन्हा दाखल रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवाच्या टी पार्इंटवर बुधवारच्या रात्री ८.२० वाजता दरम्यान चैतराम सुखराम पेशने (३९) रा. ढाकणी हा मोटारसायकल एमएच ३५ एन १४११ या वाहनाला हलगर्जीपणे चालविल्यामुळे त्याच्याविरूध्द रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मरारटोली येथे रस्त्यावर वाहन उभे ठेवणाऱ्या दोन वाहन चालकांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद सिराज इलीयाज खान (३२) रा. अमोली लालबर्रा बालाघाट हा आरोपी ट्रव्हल्स एम.पी. ५० पी. १०६२ या वाहनाला बुधवारी दुपारी १२.३० वाजता दरम्यान रस्त्यावर उभे करून ठेवले.
निवृत्तीनाथ केवलराम टिकापाचे (२५) रा. बलमाटोला याने एमएच ३५ पी.११७६ या कारला रस्त्यावर उभी करून ठेवल्याने या दोन्ही वाहन चालकावर भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पथदिवे सुरू ठेवल्यावरून सरपंचाला शिवीगाळ
गोंदिया : पथदिवे दिवसालाही सुरू आहेत ते बंद का केले नाही व हरभरा नुकसानीच्या यादीत माझे नाव का टाकले नाही म्हणून किन्ही येथील उमेश रामराज बघेले याने सरपंच बालाराम गोधन मात्रे (५२) यांना शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारच्या सकाळी ९ वाजता किन्ही येथे घडली. सदर घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या घोटी येथे बुधवारच्या सकाळी ११.३० वाजता जुगार खेळणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली. योगराज कोरे, प्रकाश बारसागडे, पांडुरंग खोटेले, पृथ्वीराज ब्राम्हणकर व गोविंदा कोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याजवळून तासपत्ते व ३३० रुपये रोख जप्त करण्यात आले. सदर आरोपींवर मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थिनीचे अपहरण
सालेकसा : सालेकसा तालुक्याच्या जमाकुडो येथील एक १७ वर्षाची मुलगी ३ नोव्हेंबर रोजी शाळेत गेली होती. मात्र ती परतली नाही. अज्ञात इसमांनी तिचे अपहरण केले. सदर घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.