‘त्या’ तोतया पीएसआयला अटक

By Admin | Updated: May 23, 2015 01:40 IST2015-05-23T01:40:28+5:302015-05-23T01:40:28+5:30

आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत असे सांगून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या...

'That' stole PSI stuck | ‘त्या’ तोतया पीएसआयला अटक

‘त्या’ तोतया पीएसआयला अटक

गोंदिया : आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत असे सांगून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या तोतया पीएसआयला तिरोडा पोलिसांनी गुरूवारच्या रात्री अटक केली. विजय ऊर्फ विजू श्रीधर डुंभरे (३५) रा. भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
तिरोडाच्या आझाद वॉर्डातील सुनील चैनराज येरपुडे यांच्या दुकानात दिनेश खोब्रागडे नाव सांगून विजय डुंभरे रा.भंडारा आला. त्याने आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत. आपल्याला दोन सोन्याच्या साखळ्या हव्या आहेत, असे त्याने सांगितले होते. त्याने येरपुडे यांच्या दुकानातून २७.६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या घेतल्या. त्या साखळ्यांची किंमत ७६ हजार ३०२ रूपये झाली. त्याने याचे पैसे धनादेशाच्या रूपाने दिले.
तो धनादेश जिल्हामध्यवर्ती बँक भंडारा येथील असून त्याचा क्रमांक २९६१७३ आहे. हा धनादेश खाते क्र. ७९१३ या क्रमांकाचा दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. या प्रकरणात येरपुडे यांची त्याने फसवणूक केली. त्याच्याविरूध्द तिरोडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम४१९, ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. २० मे रोजीचा धनादेश त्याने दिला होता. त्याला तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: 'That' stole PSI stuck