मित्राचा खून करणाऱ्या आरोपीचा मुक्काम वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST2021-06-16T04:38:39+5:302021-06-16T04:38:39+5:30
गोंदिया : मोबाईल घेण्यावरून आपसात झालेल्या भांडणातून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बंगाली शाळेजवळ ...

मित्राचा खून करणाऱ्या आरोपीचा मुक्काम वाढला
गोंदिया : मोबाईल घेण्यावरून आपसात झालेल्या भांडणातून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बंगाली शाळेजवळ ९ जून रोजी घडली. या घटनेत बबलू कदीर कुरेशी (३५) रा. गोंदिया याचा मृत्यू झाला. याचा खून करणाऱ्या मुकेश रावते (३०) रा.पुनाटोली गोंदिया याला १० जूनच्या रात्रीच रामनगर पोलिसांनी अटक केली. जिल्हा सत्र न्यायालयाने १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता १६ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी मुकेश रावते याने कुरेशी याच्याकडे असलेला मोबाईल मागितला होता. त्यावरूनच त्यांच्यात भांडण झाले होते. मात्र भांडण झाल्यानंतरही ते सोबतच होते व त्यानंतर मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात भांडण झाले असावे व त्यातूनच रावतेने मोठा दगड कुरेशीच्या डोक्यावर मारून त्याला दगडाने मारून ठार केले. सकाळी लोक उठल्यावर त्यांना कुरेशीचा मृतदेह दिसून आला. आरोपी मुकेश रावते फरार झाला होता. परंतु रामनगर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसगडे करीत आहेत.