शेतकऱ्यांच्या जीवावर उठले राज्य सरकार

By Admin | Updated: June 26, 2015 01:43 IST2015-06-26T01:43:48+5:302015-06-26T01:43:48+5:30

राज्यातील भाजप सरकारने खरिपाच्या धानासाठी बोनस जाहीर केला.

State government risen on the life of farmers | शेतकऱ्यांच्या जीवावर उठले राज्य सरकार

शेतकऱ्यांच्या जीवावर उठले राज्य सरकार

गोंदिया : राज्यातील भाजप सरकारने खरिपाच्या धानासाठी बोनस जाहीर केला. तर रबीच्या धानासाठी बोनस न देता शेतकऱ्यांचा हिरमोड केला. बोनसची घोषणाही आता धान व्यापाऱ्यांच्या हाती गेल्यावर करण्यात आली आहे. एकंदर भाजप सरकार शेतकऱ्यांचा जीवावर उठली असल्याचा आरोप भारतीय राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित डव्वा, सोनी, ठाणा, पदमपूर, कालीमाटी, पांजरा, बनाथर व रावणवाडी येथील प्रचारसभांत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, मागील पाच वर्षे जिल्हा परिषदेत भाजपचे शासन होते. या काळात जिल्हावासीयांनी भ्रष्टाचार व कुशासन बघितले. तर नेत्यांनी आपले घर भरण्याचे काम केले. अशा सत्तालोलुप नेत्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखविण्याचे आवाहनही केले.
याप्रसंगी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार रामरतन राऊत, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, नागपूर ग्रामीण कॉंग्रेस महासचिव मुजीब पठाण, गोंदिया जिल्हा महासचिव अमर वराडे, डॉ. झामसिंह बघेले, पी.जी.कटरे, वीनोद जैन , जगदीश येरोला, राजेश नंदागवळी, बंशीधर अग्रवाल, शेषराव गिरीपुंजे, अनिल बिलीया, उषा मेंढे, पन्नालाल शहारे, पृथ्वीपालसिंग गुलाटी, नामदेव किरसान, अशोक लंजे, डॉ. योगेंद्र भगत, प्रकाश रहमतकर, डोमेंद्र रहांगडाले व अन्य उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: State government risen on the life of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.