राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:06 IST2018-08-06T22:05:59+5:302018-08-06T22:06:15+5:30
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.७) तीन दिवसीय संपावर जात आहेत. याबाबत येथील कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले.

राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.७) तीन दिवसीय संपावर जात आहेत. याबाबत येथील कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले.
सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांचा लढा सुरू आहे. आपल्या मागण्यासाठी अखेर ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील १७ लाख कर्मचारी या संपात सहभागी होत असून यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगर पालिक कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाºया समावेश आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या येथील शाखेच्यावतीने तहसीलदार संजय रामटेके यांना संपात सहभागी होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले. या संपात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनासुद्धा सहभागी असल्याचे तहसीलदार रामटेके यांनी सांगीतले.