महिला जागृती अभियानास प्रारंभ
By Admin | Updated: March 16, 2016 08:37 IST2016-03-16T08:37:10+5:302016-03-16T08:37:10+5:30
समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था व युवा कोसरे कलार समाज संस्था संलग्नित सहस्त्रार्जुन महिला

महिला जागृती अभियानास प्रारंभ
गोंदिया : समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था व युवा कोसरे कलार समाज संस्था संलग्नित सहस्त्रार्जुन महिला बचत गटाच्यावतीने संयुक्तवतीने जागतिक महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी छोटा गोंदिया परिसरातील शारदा चौकात महिला जागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
उद्घाटन संस्था अध्यक्ष जैयवंता उके यांच्या अध्यक्षतेत शोभा बंसोड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्था सचिव एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे विस्तार अधिकारी तीर्थराज उके, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे सहायक आकाशानंद देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी महिलांच्या हळदी-कुंकू व परिचय संमेलनासह उपस्थित महिलांना मार्गदर्शकांनी महिलांचे हक्क व अधिकार, महिलांच्या संरक्षणार्थ असलेले विविध कायदे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा यासह विविध शासकीय विभागाच्या सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे १०० महिलांची उपस्थिती होती. संचालन मीना मेश्राम यांनी केले. प्रास्तावीक डिंपल उके यांनी मांडले. आभार ज्योती कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी किरण दखने, छाया वैरागडे, शीला मेश्राम, छाया मेश्राम, गायत्री कोसरकर, निरीपा उके, खेलनबाई मेश्राम, गीता कर्णिक, अनिता शेंडे, संगीता सोनवाने, गीता नागरीकर, लता बरडे, ममता उईके, खिलावती आसटकर, वर्षा शेंडे, रेखा सहारे, भूमेश्वरी लाडे आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)