स्वत:चे होर्डिंग काढून सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:28 PM2018-01-22T22:28:44+5:302018-01-22T22:29:29+5:30

शहरात मागील काही दिवसांपासून होर्डिंग्ज वार सुरू आहे. यामुळे शहराचे विदु्रपीकरण होत आहे.

Start by removing your own hoarding | स्वत:चे होर्डिंग काढून सुरूवात

स्वत:चे होर्डिंग काढून सुरूवात

Next
ठळक मुद्देशहर होणार होर्डिंगमुक्त : नगराध्यक्षांनी ठेवला आदर्श

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शहरात मागील काही दिवसांपासून होर्डिंग्ज वार सुरू आहे. यामुळे शहराचे विदु्रपीकरण होत आहे. तर होर्डिंग्ज लावताना थोर पुरुषांच्या पुतळ्यांचा देखील अवमान केला जात आहे. नगर परिषदेने उशीरा का होईना याची दखल घेतली. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी सोमवारी (दि.२२) रोजी स्वत:चे होर्डिंग्ज काढून शहर होर्डिंग्ज मुक्त करण्याच्या मोहीमेला सुरूवात केली.
शहरातील मुख्य चौक व थोर पुरुषांच्या पुतळ्याच्या परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी नगर परिषदेची परवानगी न घेताच होर्डिंग्ज लावले जात होते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत होते. नगर परिषदेने याला प्रतिबंध लावण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शहर होर्डिंग्ज मुक्त करण्याचे सांगत असतानाच नगर परिषदेतील सदस्य व पदाधिकारी स्वत:चेच होर्डिंग्ज लावत असल्याचे चित्र होते. अवैध होर्डिंग्ज विरोधात कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश असताना देखील शहरात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे शहरात होर्डिंग्ज युध्द पेटल्याचे चित्र आहे.
याचीच नगराध्यक्ष इंगळे यांनी दखल सोमवारी स्वत:चे होर्डिंग्ज काढून होर्डिंग्ज मुक्त मोहीमेची सुरूवात केली. विशेष म्हणजे, याप्रसंगी त्यांनी नगर परिषदेतील विनय चौरसिया यांना शहरातील अवैध होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यासाठी प्रजासत्ताक दिनापर्यंत सवलत दिली असून त्यानंतर मात्र नगर परिषदेची परवानगी नसलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

होर्डिंग बनविणाºयांना परवानगीची अट
शहरात आजघडीला मोठ्या संख्येत होर्डिंग्ज तयार करणारे आहेत. त्यांच्याकडून कुणीही होर्डिंग्ज बनवून कुठेही लावत आहे. यावर नगर परिषदेला नियंत्रण ठेवणेही शक्य नाही. यावर तोडगा म्हणून नगराध्यक्ष इंगळे यांनी, होर्डिंग्ज तयार करणाºया व्यवसायीकांसोबत याप्रसंगी चर्चा केली. यात त्यांनी होर्डिंग्ज तयार करताना नगर परिषदेची परवानगी घेण्यास सांगितले. नगर परिषदेची ठरावीक दिवसांची परवानगी व जागा नमूद झाल्यावर तेवढे दिवस ते होर्डिंग्ज ठरावीक जागेवर लावता येणार. तर ठरवून दिलेल्या कालावधीनंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Start by removing your own hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.