आरमोरी, वैरागडात धान खरेदी केंद्र सुरू करा
By Admin | Updated: November 18, 2015 01:57 IST2015-11-18T01:57:56+5:302015-11-18T01:57:56+5:30
१० आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते.

आरमोरी, वैरागडात धान खरेदी केंद्र सुरू करा
देवरी : १० आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु आधारभूत केंद्राच्या अडचणीमुळे धान खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. त्याचा त्रास शेतकरी बांधवाना सोसावा लागला.
याबद्दल आमगाव विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी ९ नोव्हेंबर रोजी राज्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची भेट घेऊन चर्चा केली. शेवटी प्रधान सचिव यांनी सर्व आधारभूत धान खरेदी केंद्राना १० नोव्हेंबर २०१५ पासून आदिवासी सहकारी संस्थाचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले.
या अनुषंगाने मंगळवारी १० नोव्हेंबरला देवरी व चिचगड येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्राची सुरूवात माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास महामंडळ नाशीकचे संचालक भरतसिंग दुधनाग होते. अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, जगदीश नरवरे आदी उपस्थित होते.
या वेळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या धानाची मान्यवराच्या हस्ते मोजमाप करून खरेदी करण्यात आली. धान खरेदी केंद्राची सुरूवात करण्याकरिता आ. संजय पुराम यांच्या प्रयत्नांबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. क्षेत्रातील सर्वच आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कटीबध्द असल्याचे आ. संजय पुराम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)