अल्पसंख्यकांच्या विकासासाठी गोंदियात कार्यालय सुरू करा
By Admin | Updated: September 15, 2015 04:27 IST2015-09-15T04:27:56+5:302015-09-15T04:27:56+5:30
शासनातर्फे अल्पसंख्यक समाजासाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु या योजनांची अंमलबजावणी

अल्पसंख्यकांच्या विकासासाठी गोंदियात कार्यालय सुरू करा
गोंदिया : शासनातर्फे अल्पसंख्यक समाजासाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता अल्पसंख्यक विभागाचे जिल्ह्यात कार्यालय नाही. परिणामी अल्पसंख्याकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर मौलाना आझाद कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपा अल्पसंख्यक आघाडीने केली आहे.
जिल्हाध्यक्ष अहमद मनियार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार, अल्पसंख्यांक समाजाचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येतात. पण गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन १६ वर्षांचा कालावधी लोटला. तरीपण अल्पसंख्यक समाजाच्या विकासाकरिता कोणतेच विभाग सुरू करण्यात आले नाही. सर्व सामान्य जनतेच्या विकासाकरिता शासनाचे सर्व विभाग सुरू करण्यात आले. सर्व सामान्य जनतेच्या विकासाकरिता शासनाचे सर्व विभाग सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील अल्पसंख्यकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या हिताची कामे करण्याकरिता अल्पसंख्यक विभागाचे कार्यालय किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला मंजुरी मिळाली असून हे कार्यालय त्वरित सुरू करण्यात यावे.
सदर मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब आमीर यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)