नागपूर-इंदौर एक्स्प्रेस गोंदियावरून सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:13+5:302021-03-27T04:30:13+5:30
गोंदिया : नागपूर येथून इंदौरसाठी जाणारी एक्स्प्रेस गोंदिया येथून सुरू करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य ...

नागपूर-इंदौर एक्स्प्रेस गोंदियावरून सुरू करा
गोंदिया : नागपूर येथून इंदौरसाठी जाणारी एक्स्प्रेस गोंदिया येथून सुरू करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विनोद चांदवानी यांनी समितीच्या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सेंट्रल रेल्वे सल्लागार समितीची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यात सदस्यांकडून त्यांच्या काही सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावर चांदवानी यांनी, नागपूर-इंदौर गाडी गोंदिया येथून सुरू केल्यास ही गाडी दक्षिण भागात जोडणार असून, ही गाडी गोंदिया-जबलपूर सुरू केल्यास अंतर कमी होऊन शेजारच्या राज्यांतील प्रवाशांना याचा फायदा होईल. तसेच इंटरसिटी व शिवनाथ एक्स्प्रेसला इतवारीऐवजी नागपूर येथून पुन्हा सुरू करण्यावर चर्चा झाली, जेणेकरून प्रवाशांनाच याचा लाभ होईल. प्रवाशांना इतवारी येथून गाडीत चढण्यास त्रास होत असून, वेेळेवर कुली व प्रवासी वाहन न मिळाल्यास महिलांना रात्री गैरसोयीचे होते. अशात इंटरसिटीला नागपूर येथून ६.३० वाजता सुरू केल्यास या गाडीला जोड राहणार असल्याने नागपूर ते रायगड (छत्तीसगड) प्रवाशांचा मुंबई संपर्क सुविधाजनक होणार अशी चर्चा झाली.