मस्त्य बीज केंद्र सुरू करा
By Admin | Updated: September 18, 2015 01:35 IST2015-09-18T01:35:27+5:302015-09-18T01:35:27+5:30
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच मत्स्य व्यवसायाला येथे मोठे उधान आलेले असते.

मस्त्य बीज केंद्र सुरू करा
ेुसंस्थेची मागणी : तलावाच्या जिल्हा वाऱ्यावर
बाराभाटी : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच मत्स्य व्यवसायाला येथे मोठे उधान आलेले असते. परंतु अनेक ठिकाणच्या केंद्रावर कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार सुरू असून केंद्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. या केंद्रावर अधिकारी नसल्याने मासेमार बांधवांची उपासमार होत आहे. त्यामुळए मत्स्य बीज केंद्र सुरु करा अशी मागणी संघमैत्री मस्त्यपालन संस्थेचे अध्यक्ष दिलवर रामटेके यांनी केली आहे.
गोठणगाव मस्त्य बीज केंद्रावर बीज घेण्याकरीता गेले असता त्या ठिकाणी अधिकारी नसतात. तेथील कर्मचारी नेहमीच नशेत असतात अशा तक्रारी केल्या जात आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे या केंद्रावर अनेक समस्या पहायला मिळाल्या आहेत. शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी बीज पाहिजे तसे मिळत नाही व काळाबाजार करुन बीज विकले जाते, अशी तक्रार मत्स्य पालन संस्थेची आहेत.
तालुक्यातील केंद्रावर बीज मिळाले असते तर कशाला कोलकाता छत्तीसगड येथून बिज आणावे लागले असते, अशा तक्रारीही संस्थांकडून केल्या जात आहेत.
सदर केंद्रावर पाच कोटी मत्स्य बीज निर्मिती केली जात होती. परंतू आता या केंद्रावर कर्मचारी काळाबाजार करुन येथील बीज आणि मासोळी विकत असल्याचे दिसून आले. एवढ्यावरही मात्र या प्रकाराकडे अधिकाऱ्यांची नजर नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी मत्स्य विकास अधिकारी नाही. अशा अनेक समस्यांनी हे केंद्र ग्रासले आहे. तेव्हा मत्स्य विकास अधिकारी आणि येथील कर्मचारी यांच्यावर नियंत्रण असावे व केंद्र सुरळीत चालावे अशी मागणी दिलवर रामटेके, दामू डूमाने आणि अनेक मत्स्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)