लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करतात. यंदा जवळपास १ हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी मक्याची लागवड करुन उत्पन्न घेतले. मक्याचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मात्र अद्यापही मक्का खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी विचारात घेता शासनाने त्वरीत मक्का खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे ठप्प असल्याने शेतकºयांना त्यांच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी अडचण जात आहे. तर ‘लॉकडाऊन’मुळे शेतमालाला मागणी नसल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे काबाड कष्ट करुन आणि रक्ताचे पाणी करुन मोठ्या मेहनतीने घेतलेल्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच परिस्थिती सध्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मक्का उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात हजारो हेक्टरवर मक्याचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामातील मक्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मागील वर्षी राज्य शासनाचा मक्याचा हमीभाव एक हजार ७६० रुपये एवढा होता. मक्याचा खुल्या बाजारात भाव दोन हजार रुपये प्रती क्विंटल होता. मात्र यावर्षी आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मक्का उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाºयांना मक्याची विक्री करावी लागत आहे. तर काही खासगी व्यापारी या परिस्थितीचा फायदा घेवून शेतकऱ्यांकडून एक हजार २०० रुपये प्रती क्विंटल दराने मक्का खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रती क्विंटल ८०० रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र आर्थिक कोंडीमुळे व हमीभाव केंद्राअभावी शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासनाने तालुक्यात मक्का खरेदीसाठी ठिकठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी तरोणे यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ व खासदार पटेल यांच्याकडे केली आहे.
मक्का हमीभाव केंद्र त्वरीत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे ठप्प असल्याने शेतकºयांना त्यांच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी अडचण जात आहे. तर ‘लॉकडाऊन’मुळे शेतमालाला मागणी नसल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे काबाड कष्ट करुन आणि रक्ताचे पाणी करुन मोठ्या मेहनतीने घेतलेल्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मक्का हमीभाव केंद्र त्वरीत सुरू करा
ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : अन्न व नागरी पुरवठा विभागाला पत्र