दुपारपाळीत लोकल गाडी सुरू करा
By Admin | Updated: April 1, 2015 00:46 IST2015-04-01T00:46:27+5:302015-04-01T00:46:27+5:30
सालेकसा रेल्वे स्टेशनवरून लाईन मार्गावर गोंदिया-नागपूरकडे जाण्यासाठी सकाळी ९ वाजता पासून सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुमारे आठ तास कोणतीच रेल्वे सेवेची सोय नाही.

दुपारपाळीत लोकल गाडी सुरू करा
सालेकसा : सालेकसा रेल्वे स्टेशनवरून लाईन मार्गावर गोंदिया-नागपूरकडे जाण्यासाठी सकाळी ९ वाजता पासून सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुमारे आठ तास कोणतीच रेल्वे सेवेची सोय नाही. त्यामुळे या दरम्यान सालेकसा तालुक्यातील लोकांना स्वस्त रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर रेल्वे सेवेअभावी सामान्य प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी कर्मचारी वर्गाची मोठी गैरसोय घेत असते. दुपारच्या दरम्यान दुर्ग-इतवारी किंवा डोंगरगड इतवारी लोकल गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी सालेकसा तालुकावासीयांनी केली आहे.
सालेकसा तालुक्यातून मुंबई-हावडा रेल्वे मार्ग गेला असून तालुक्याला एकूण तीन रेल्वे स्टेशन लाभले आहेत. यात दरेकसा आणि धानोली येथे फक्त काही लोकल गाड्याचाच थांबा आहे. तर सालेकसा रेल्वे स्टेशनवर सहा लोकल गाड्या आणि दोन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. सांगायला आठ गाड्यांचा थांबा आहे परंतु त्याचा लाभ सालेकसावासीयाना तेवढा घेता येत नाही. कारण की सालेकसा रेल्वे स्टेशनवरून विचार केला तर या सर्व गाड्या सायंकाळ ते सकाळच्या दरम्यान धावणाऱ्या जास्त आहे. परंतु सकाळ ते सायंकाळ दरम्यान विशेष करून दुपारी एक ही गाडीची सोय या स्टेशनवर नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सेवेचा लाभ मिळत नाही.
सालेकसा तालुक्यात गरीब आदिवासी, सामान्य शेतकरी, शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात त्याला आपल्या रोजच्या मजुरीवर जास्त अवलंबून राहावे लागत असते. अशा वर्गाला रेल्वेचा स्वस्त प्रवास परवडणारा असतो. परंतु गरजेच्या वेळी रेल्वे गाडीची सोय नसल्याने सामान्य प्रवाश्यासोबतच व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी आदी लोकांना सुध्दा रेल्वेने प्रवास करण्याचा लाभ मिळत नाही. सालेकसा हा तालुका मुख्यालयाचा ठिकाण असून येथील ग्राम पंचायत समाप्त करून आता नगर पंचायतचे स्वरूप देण्यात येत आहे. त्याच बरोबर मुख्यालयाचा व परिसराचा विकासात्मक विस्तार वेगाने होत आहे. अशावेळी स्वाभाविकरित्या येथे ये-जा करणाऱ्याची व प्रवाशाची संख्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात सालेकसा रेल्वे स्टेशनवर दुपारच्या वेळेत ये-जा करणाऱ्या लोकल गाड्या दुर्ग-गोंदिया, डोंगरगड-इतवारी दरम्यान सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)