चांदोरी खुर्द येथे कोविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST2021-04-30T04:37:11+5:302021-04-30T04:37:11+5:30
तिरोडा : शहारी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्ण वाढत आहेत, अशातच तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील आरोग्यवर्धिणी उपकेंद्रात ...

चांदोरी खुर्द येथे कोविड केअर सेंटर सुरू करा
तिरोडा : शहारी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्ण वाढत आहेत, अशातच तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील आरोग्यवर्धिणी उपकेंद्रात ऑक्सिजनयुक्त २० बेडस्चे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील जनता व तालुका पत्रकार संघाने केली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात प्रथम कोरोना अलगीकरण केंद्र चांदोरी खुर्द येथील केंद्रातून सुरू करण्यात आले होते. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला. रुग्णसुद्धा बरे होऊन घरी परतले. चांदोरी खुर्द हे एक केंद्र शांत ठिकाणी वैनगंगा नदीकाठावर आहे. शुद्ध हवा, शुद्ध नैसर्गिक प्राणवायू, रुग्णांसाठी सायंकाळी थंड हवेचे ठिकाण आहे. परिसरातील चांगली बाब असून, कोविड सेंटरसाठी उपयुक्त आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करून कोविड सेंटर सुरू केल्यास ग्रामीण भागातील गरीब, गरजू, शेतकरी, कामगार, बाराबलुतेदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. याठिकाणी २० बेडचे ऑक्सिजन रूम, अन्य सुविधा, व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करता येऊ शकतात. कोट्यवधी रुपये खर्चून रुग्णालयात तयार करण्यात आले; पण त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
.....
सोयी-सुविधांचा अभाव
याठिकाणी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिनियुक्तीवर परिचारिका आहे; पण आरोग्य विभागाकडून त्यांना बसण्यासाठी टेबल, खुर्ची, तपासणी टेबल व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. या असुविधेची संपूर्ण माहिती तालुका वैद्यकीय अधिकारीऱ्यांना आहे; पण सर्व आरोग्य अधिकारी नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत.
......
कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी
शासन कोट्यवधी रुपये कोरोना परिस्थितीवर खर्च करते; पण रुग्णालयातून उपचारासाठी सुविधा, व्यवस्था जातात तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. चांदोरी खुर्द येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात २० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवार, सचिव विजय खोब्रागडे, राधेश्याम नागपुरे, निलू साकुरे, लक्ष्मीनारायण दुबे, अतीत डोंगरे, अजय नंदागवळी, मुकेश अग्रवाल, नितीन आगाशे, मुरलीदास गोंडाणे, देवानंद शहारे, नरेश असाटी, स्पन्नील शहारे, सचिन ढबाले, अमरदीप बडगे, मोरेश्वर भांडारकर, तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.
शासन कोट्यवधी रुपये कोरोना परिस्थितीवर खर्च करते; पण रुग्णालयातून उपचारासाठी सुविधा, व्यवस्था जातात तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. चांदोरी खुर्द येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात २० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवार, सचिव विजय खोब्रागडे, राधेश्याम नागपुरे, निलू साकुरे, लक्ष्मीनारायण दुबे, अतीत डोंगरे, अजय नंदागवळी, मुकेश अग्रवाल, नितीन आगाशे, मुरलीदास गोंडाणे, देवानंद शहारे, नरेश असाटी, स्वप्नील शहारे, सचिन ढबाले, अमरदीप बडगे, मोरेश्वर भांडारकर, तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.