प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:04+5:302021-04-22T04:30:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लोक प्रभावित होत आहेत. गतवर्षी जी ...

प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लोक प्रभावित होत आहेत. गतवर्षी जी खबरदारी घेण्यात आलेली होती, ती यावेळी घेण्यात आलेली नाही. कोरोना संसर्गाबाबतची लोकांना भीती राहिलेली नाही. त्यामुळे समाजामध्ये अनियंत्रितपणे संसर्ग पसरलेला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव किरसान यांनी केली आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून सर्वच तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील रुग्णांना उपचारासाठी गोंदिया येथे पाठवले जात आहे. त्यामुळे गोंदियातील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. काही रुग्णांचा रुग्णालयात दाखल न केल्याने मृत्यूदेखील झाला आहे. ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर स्थापन करुन रुग्णावर त्याठिकाणी उपचार केल्यास गोंदियातील रुग्णालयांचा ताण कमी होईल. तसेच ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जागा नसल्यास कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन त्या-त्या तालुक्यातील रुग्णांना त्यांच्याच तालुक्यातच उपचार मिळतील व गोंदियातील शासकीय रुग्णालयांचा ताण कमी होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी किरसान यांनी केली आहे.