सिटी स्कॅ न मशीन त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 02:41 IST2017-04-22T02:41:22+5:302017-04-22T02:41:22+5:30
येथील केटीएस रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्यात यावी.

सिटी स्कॅ न मशीन त्वरित सुरू करा
शहर कॉंग्रेस कमिटीची मागणी : जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन
गोंदिया : येथील केटीएस रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्यात यावी. तसेच रूग्णालयात आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात यावी या मागणीला घेऊन शहर कॉंग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अजय केवलिया यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले.
जिल्हा शल्य चिकीत्सकांसोबत झालेल्या चर्चेत कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने, गोंदिया शहर जिल्हास्थळ असून प्रमुख ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह लगतच्या राज्यातील जनताही येथेच उपचारासाठी येते. मात्र जिल्हा रूग्णालयात असलेली सिटी स्कॅन मशीन मागील कित्येक दिवसांपासून बंद पडून आहे. परिणामी गरिब रूग्णांना बाहेर खाजगी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन करावे लागत आहे. याशिवास रूग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, औषधे मिळत नाहीत, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, उन्हाळ््यात कुलर, पंखे व जनरेटर बंद पडून असतात. अशात कित्येकदा रूग्णांचा जीव जातो.
रूग्णालयातील समस्यांना घेऊन कि त्येकदा चर्चा झाली. मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांत सीटी स्कॅन मशीन सुरू करून रूग्णालयाती व्यवस्था दुरूस्त करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन दिले. यावर केवलिया यांनी जोपर्यंत सिटी स्कॅन मशीन सुरू होत नाही, तोपर्यंत बीपीएल धारकांचे बाहेरून स्कॅन करविण्यात येणार. तसेच अन्य सुविधा लवकरच उपलब्ध करविल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, राकेश ठाकूर, शकील मंसूरी, संदीप रहांगडाले, अमर वराडे, संदीप ठाकूर, सुनिल भालेराव, सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंकट पाथरू, देवा रूसे, मंटू पुरोहीत, मनोज पटनायक, छोटी चौधरी, नफीस सिद्धीकी, आलोक मोहंती, अॅड. अजय फेंडारकर, खलील पठाण, अमर रंगारी, राकेश जायस्वाल व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)