आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा

By Admin | Updated: November 6, 2014 22:58 IST2014-11-06T22:58:35+5:302014-11-06T22:58:35+5:30

जवळ असलेल्या नवेझरी या गावी दरवर्षी आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू होत होते. पण यावेळी दिवाळीचा उत्सव संपला, परिसरात सध्या मंडईची धूम सुरू झाली, शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले,

Start the basic Paddy Purchase Center | आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा

आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा

मुंडीकोटा : जवळ असलेल्या नवेझरी या गावी दरवर्षी आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू होत होते. पण यावेळी दिवाळीचा उत्सव संपला, परिसरात सध्या मंडईची धूम सुरू झाली, शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले, पण शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न केल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैशाच नाही. त्यामुळे नवेझरी परिसरात त्वरीत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी तिरोडा तालुका शिवसेना उपप्रमुख महेंद्र भांडारकर व शेतकऱ्यांनी केली आहे.
परिसरातील अनेक गावात जलाशय व कालवे यांच्या सहाय्याने हलक्या धानाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाऊस अधिक प्रमाणात पडला नसला तरी शेतकऱ्यांनी आपली रोवणी आटोपून घेतली. आता दिवाळी गेली व मंडईला सुरूवात झाली.
मंडईतही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. हलके धान विकून पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला. तर आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. हलक्या धानाचा हंगाम विविध रोगांमुळे समाधानकारक नसला तरी खास मंडईनिमित्ताने या भागातील शेतकरी पाऊस आला नाही तरी हलक्या धानाची कापणी व मळणी करून मंडईचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पण खर्चाकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे खर्चापोटी शेतकरी धान व्यापाऱ्याला विकत आहेत. व्यापाऱ्याकडे धानाला भाव नाही. व्यापारी फार कमी किंमतीत धान घेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहेत.
यावेळी शेतकरी हा कोंडीत दिसत आहे. पण शेतकऱ्यांचा वाली कुणी दिसत नाही. अनेक समस्या सहन करूनही आता या समस्येला शेतकरी तोंड देत आहेत. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शासनाने नवेझरी येथे आधारभूत धान खरेदी सुरू करण्याची मागणी तालुका उपप्रमुख शिवसेना तिरोडा महेंद्र भांडारकर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Start the basic Paddy Purchase Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.