‘एसटी’ला ६८ वर्षे पूर्ण

By Admin | Updated: June 1, 2016 02:24 IST2016-06-01T02:24:08+5:302016-06-01T02:24:08+5:30

१ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन आहे. या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालय, आगार व बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्याची सुचना एस.टी. विभागाने दिली आहे.

'ST' has completed 68 years | ‘एसटी’ला ६८ वर्षे पूर्ण

‘एसटी’ला ६८ वर्षे पूर्ण

गोंदिया : १ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन आहे. या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालय, आगार व बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्याची सुचना एस.टी. विभागाने दिली आहे. त्यानुसार गोंदिया आगारात वर्धापन दिन थाटात साजरा केला जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव केला जाईल, अशी माहिती आगार व्यवस्थापन गौतम शेंडे यांनी दिली आहे.
१ जून १९४८ रोजी जन्मास आलेल्या एस.टी. महामंडळाने मागील ६८ वर्षात संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आजमितीस एसटी महामंडळाकडे १७ हजार ५०० गाड्या आहेत. आगारात ८४ बसेस आहेत. संपूर्ण राज्यात १ लाख ५ हजार कर्मचाऱ्यांना एसटीने रोजगार दिला आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्यास एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकते. ही बाब लक्षात घेवून विविध कार्यक्रमांनी वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिर, प्रवाशांचे स्वागत, शहनाई वादन, आगाराची रंगरंगोटी आणि कार्यक्रमाचे उद्घाटन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'ST' has completed 68 years