शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

एसटी बसचे लोकेशन कुठेय? आता घरबसल्या समजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:48 IST

राज्य परिवहन महामंडळाचे अॅप आले : प्रवाशांना मिळणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न सतावत असतो. आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे. त्यांना हवी असलेली बस कुठे आहे, किती वेळात स्थानकावर येणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत. 'एमएसआरटीसी अॅप'च्या माध्यमातून मोबाइलवर एसटी कुठे थांबली, कधीपर्यंत पोहोचेल याची इत्थंभूत माहिती तुम्हाला कुठूनही मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता 'व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम' 'एमएसआरटीसी कॉम्प्युटर' हे नवीन अॅप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. बस कुठे आहे ते आता त्यांना घरीबसल्या कळणार आहे.

काय आहे अँप ?अँपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा दिली आहे.

असे करा डाऊनलोडप्ले स्टोअरवर 'एमएसआरटीसी कॉम्प्युटर अॅप उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप प्रवाशांना वापरता येईल. वापरास अॅप सोपे आहे.

अपघात झाल्यास मदत मिळणारमहिलांना १०० किंवा १०३ क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा तसेच अपघात झाल्याची माहिती, वैद्यकीय मदतही प्रवाशांना अॅपद्वारे मागवता येणार आहे.

बस कुठे आहे हे आधीच कळणार?बसेसना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) बसविली आहे. याद्वारे बसचे लोकेशन, वेळापत्रक या सर्वांची माहिती प्रवाशांना मिळेल.

अभिप्राय, तक्रारी नोंदविण्याची सोय• एसटी प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधा आहे.• तक्रारींमध्ये 'वाहक-चालक', 'बसस्थिती', 'बससेवा', 'ड्रायव्हिंग', 'मोबाइल अॅप' असे वर्गीकरण केले आहे.• तक्रारदारास मोबाइल, वाहन क्रमांक नोंदवावा लागेल.

जिल्ह्यातील आगारनिहाय बसेसगोंदिया - ७६तिरोडा - ४७

आगारातील सर्वच बसेसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे प्रवाशांना बसेसची स्थिती कळून येते. शिवाय, बसस्थानकातही मोठी स्क्रीन लावली आहे.- संजना पटले, आगार व्यवस्थापक, तिरोडा 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सgondiya-acगोंदिया