क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By Admin | Updated: May 15, 2016 01:26 IST2016-05-15T01:26:37+5:302016-05-15T01:26:37+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा भारती व कराटे क्लब यांच्या संयुक्तवतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक बुनियादी शाळेत आयोजीत आठ दिवसीय ....

क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप
उत्कृष्ट प्रतिसाद : खेळाडूंना केले सन्मानित
आमगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा भारती व कराटे क्लब यांच्या संयुक्तवतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक बुनियादी शाळेत आयोजीत आठ दिवसीय उन्हाळी क्रिडा शिबिराचा समारोप थाटात करण्यात आला.
पारसमल सेठीया इंग्लीश प्रायमरी शाळेच्या पटांगणावर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरातील विद्यार्थ्यांना आत्ममाध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन कराटे, बॉक्सिंग, तायक्वांडो, जुडो, योगा, प्राणायाम, वुशु, बुध्दीबळ, सूर्यनमस्कार, अथलेटीक्स, अॅरोबीक, पोलीस भरती ट्रेनिंग आदी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच धीरेश पटेल होते. विशेष पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामेश्वर श्यामकुंवर, पंचायत समिती सदस्य छबु उके, संजय डोये, ग्रामपंचायत सदस्य महेश उके, अरविंद असाटी, जगदिश सावरकर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींनी अनेक खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शिबिरातील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिबिराचे आयोजन सुनील शेंडे, विनायक अंजनकर, टी.ए. आलोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर मुख्य प्रशिक्षक म्हणून हेमंतकुमार चावके, संगम बावणकर, मुकेश शेंडे, रामेंद्र बावणकर, अर्चना सावरकर, सोहेल डोये यांनी प्रशिक्षण दिले. बुध्दीबळ प्रशिक्षण आदित्य लुलु यांनी दिले.
संचालन नरेंद्र चावके यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार हेमंत चावके यांनी मानले. कार्यक्रमासाठी लोणकर, डी.डी. नागपुरे, डॉ. अवूत मुंजे, रागिनी पाचे, अजित सव्वालाखे, कोमल रहिले, अभिषेक मेश्राम, विकास उके, प्रेरणा हेमणे, मानसी चोखाडे, शैलेश हटवार, मुकेश कांबळे इत्यादीनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)