आश्रमशाळांनी दाखविले क्रीडा कौशल्य

By Admin | Updated: September 4, 2016 00:17 IST2016-09-04T00:17:30+5:302016-09-04T00:17:30+5:30

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजार येथे शासकीय व अनुदानित

Sports Skills Shown by Ashram Shalas | आश्रमशाळांनी दाखविले क्रीडा कौशल्य

आश्रमशाळांनी दाखविले क्रीडा कौशल्य

केंद्रस्तरीय स्पर्धांची सांगता : ११ शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग
देवरी : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजार येथे शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत ११ शाळा सहभागी झाल्या होत्या.
या केंद्र्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत बोरगाव/बाजार, पालांदूर (जमी.), कडीकसा व ककोडी अशा ४ शासकीय आश्रमशाळा, भागी, कोसबी, बुधेवाडा, शेरपार, म्हैसूली, येरंडी अशा ६ अनुदानीत आश्रमशाळा आणि १ एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कूल बोरगाव/बाजार या शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत एकूण ५८३ खेळाडूंनी सहभाग घेऊन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देवरीचे सहायक प्रकल्प अधिकारी राघोते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहायक प्रकल्प अधिकारी विजय टेंभुर्णीकर, अतिथी म्हणून देवरी प्रकल्पाचे शिक्षण विस्तार अधिकारी संतोष जाधव, क्रीडा समन्वयक प्रेमलाल कोरोडे, गट समन्वयक तितराम, प्राचार्य जगदीश बारसागडे उपस्थित होते.
चार दिवस दरम्यान सांघीक कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅडबॉल व मैदानी १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर व ५००० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक, थाली फेक अश्या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे बक्षीस वितरण एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जि.प.सदस्य उषा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या १४ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषीक अनुदानीत आश्रमशाळा बुधेवाडा, द्वितीय अनुदानित आश्रमशाळा कोसबी, खो-खो मध्ये प्रथम बुधेवाडा, द्वितीय अनुदानीत आश्रमशाळा म्हैसूली, हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम बुधेवाडा द्वितीय शासकीय आश्रमशाळा पालांदूर, १४ वर्ष मुलीच्या वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम म्हैसूली, द्वितीय बुधेवाडा, खो-खो स्पर्धेत प्रथम बुधेवाडा, द्वितीय पालांदूर हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम पालांदूर, द्वितीय बुधेवाडा, मुलांच्या १७ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम म्हैसूली, द्वितीय अनुदानीत आश्रमशाळा शेरपार, खो-खो स्पर्धेत प्रथम, बुधेवाडा द्वितीय म्हैसुली हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम पालांदूर तर द्वितीय शासकीय आश्रमशाळा ककोडी, मुलीच्या १७ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम म्हैसुली, द्वितीय शासकीय आश्रमशाळा बोरगाव/बाजार तर खो-खो स्पर्धेत प्रथम पालांदूर, द्वितीय बुधेवाडा, व्हॉलीबाल स्पर्धेत प्रथम पारितोषीक बोरगाव/बाजार, द्वितीय बुधेवाडा शाळेच्या मुलांच्या १९ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषीक कडीकसा खो-खो स्पर्धेत प्रथम कडीकसा, द्वितीय अनुदानीत आश्रमशाळा येरंडी, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम कडीकसा तर द्वितीय येरंडी शाळेला मिळाला. मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषीक बोरगाव/बाजार, द्वितीय येरंडी खो-खो स्पर्धेत प्रथम बोरगाव/बाजार, द्वितीय कडीकसा, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम बोरगाव/बाजार तर द्वितीय पारितोषीक कडीकसा आश्रमशाळेला मिळाले.
केंद्रस्तरीय विजेता संघ शासकीय आश्रमशाळा कडीकसा व उपविजेता संघ शासकीय आश्रमशाळा बोरगाव/बाजार ठरले. यशस्वीतेसाठी पार पाडण्याकरीता केंद्र समन्वयक प्रेमलाल कोरोडे, समन्वयक प्राचार्य जगदीश बारसागडे, क्रीडा शिक्षक नेताजी गावड, मोहन मारबते, भूपेश आरीकर, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Sports Skills Shown by Ashram Shalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.