स्वदेशी खेळात होतो नुसताच ‘खेळखंडोबा’

By Admin | Updated: January 31, 2015 23:22 IST2015-01-31T23:22:42+5:302015-01-31T23:22:42+5:30

सडक-अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वर्ग १ ते ४ (प्राथमिक) आणि वर्ग ५ ते ७ (माध्यमिक) गटाच्या माध्यमातून स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे

The 'Sports Block' | स्वदेशी खेळात होतो नुसताच ‘खेळखंडोबा’

स्वदेशी खेळात होतो नुसताच ‘खेळखंडोबा’

सडक अर्जुनी : सडक-अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वर्ग १ ते ४ (प्राथमिक) आणि वर्ग ५ ते ७ (माध्यमिक) गटाच्या माध्यमातून स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन तालुक्यातील खडकी-बाम्हणी या गावी केले आहे. मात्र हे खेळ केवळ औपचारिकता म्हणून खेळले जात असल्यामुळे या खेळांच्या आयोजनामागील मूळ हेतूच बाजुला राहात आहे.
स्वदेशी खेळाच्या माध्यमातून शारीरिक, सामाजिक व बौद्धिक विकास होते. याशिवाय यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, अशीही अपेक्षा आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ७६ शाळा असून ३ हजार ६३१ मुले आणि ३ हजार ४६३ मुली त्यातून शिक्षण घेतात. वर्ग ५ ते ७ च्या माध्यमिक शाळा ४९ आहेत. त्यात २ हजार ९९० मुले तर २ हजार ९८० मुली आहेत. स्वदेशी खेळाच्या तालुका ते जिल्हास्तरिय सामने होणार असल्याची माहिती मिळताच हौसी शाळेतील शिक्षक फक्त स्पर्धा होण्याच्या एक महिना अगोदर मुलांना सराव करण्याची संधी देतात. वास्तविक जे खेळ खेळले जाणार आहेत त्या खेळांचा सराव वर्षभर चालला पाहिजे.
शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शाळेच्या या मुलांना खेळण्यासाठी पटांगणाची जागा असणे आवश्यक आहे. शाळेला पटांगण आहे पण त्या शिक्षकाच्या माध्यमातून मुलांना शारीरिक शिक्षण दिले जात नसल्याची बाब पुढे आली आहे. म्हणजे परीक्षा एक महिन्यावर येवून ठेपली असता अभ्यास करायचा व परीक्षा कशीतरी पास करायची अशी परिस्थिती आहे.
स्वदेशी खेळांचा सराव प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुलांना वर्षभर करण्यासाठी बाध्य केल्यास त्यातून चांगले खेळाडू तयार होऊ शकतात. या दृष्टीने शासनानेही योग्य ती पावले उचलणे गरजेचे झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत दररोजच्या शेवटच्या तासिकेला शारीरिक शिक्षणाचा वर्ग घेतला पाहिजे, पण तालुक्यात कोणत्याही शाळेत शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतल्या जात नसल्याचे दिसत आहे. शिक्षण विभागाने लक्ष देवून शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेण्यास बाध्य केले पाहिजे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The 'Sports Block'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.