क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले राजकारणाचे ‘प्लॅटफार्म’

By Admin | Updated: January 10, 2015 22:58 IST2015-01-10T22:58:22+5:302015-01-10T22:58:22+5:30

विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक, बौद्धिक क्षमतांचा विकास व्हावा व त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशाने सध्या केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा व सांस्कृतिक

Sports and cultural events have become the politics platform | क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले राजकारणाचे ‘प्लॅटफार्म’

क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले राजकारणाचे ‘प्लॅटफार्म’

विजय मानकर - सालेकसा
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक, बौद्धिक क्षमतांचा विकास व्हावा व त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशाने सध्या केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा व सांस्कृतिक संमेलनांचे आयोजन केले जात आहे. ही सगळी संमेलने फक्त खेळभावनेतून घेतली जाणे आणि त्यातून खिलाडूवृत्ती जोपासली जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात राजकीय लोकांसाठी हा एक प्लॅटफार्म झाले आहे.
विद्यार्थी जीवनातील कोवळ्या मनाला प्रोत्साहित करण्याचे काम झाले पाहिजे, परंतु कोणत्याही संमेलनात खेळाडू मुलामुलींचा विकासात्मक विचार न करता राजकारणी लोक आपआपली पोळी भाजण्यासाठी क्रीडा संमेलनाच्या स्टेजचा वापर करीत आहे असे दिसून येते. यामुळे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच त्याचबरोबर बौद्धिक क्षमता व कलात्मक गुण प्रकट करण्याच्या संधीपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.
१९९९ मध्ये भंडारा जिल्ह्यातून वेगळा होवून गोंदिया जिल्हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. तेव्हा गोंदिया जिल्ह्यात स्वतंत्र स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची स्थापना व नोंदणी करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक वर्षी सामन्यत: डिसेंबर व जानेवारी महिन्यात केंद्र व तालुकास्तरावर क्रीडा संमेलने घेवून नंतर शेवटी जिल्हा स्तरावरचे क्रिडा संमेलन घेतले जातात. जिल्हा संमेलन जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी जिल्हा संमेलन जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी पार पाडले जातात. त्यानंतर याची मर्यादा संपते. कारण स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ हे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित आहे. प्रत्येक १० ते १५ प्राथमिक शाळा मिळून एक ठिकाणी केंद्र संमेलन घेण्यात येते. त्यानंतर प्रत्येक केंद्रातील विजयी चमू एकत्रित बोलावून तालुका संमेलन घेतली जातात व शेवटचा टप्प्यात जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील विजयी चमूंचे जिल्हा संमेलन कोणत्याही एका ठिकाणी घेतले जाते.
या संमेलनात कबड्डी, खो-खो हे सांघिक तर दौड लांब उडी, उंच उडी आदी वैयक्तीक तसेच नाटक, लेझीम व समूह नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेक्षणीय कवायतीची स्पर्धा घेतली जाते.

Web Title: Sports and cultural events have become the politics platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.