टॅलेंट सर्च परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: December 20, 2015 01:50 IST2015-12-20T01:50:14+5:302015-12-20T01:50:14+5:30

लोकमत व बालविकास मंच पेस आयआयटी एन्ड मेडीकल यांच्या संयुक्तवतीने रविवारी (ता.१३) येथील एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये टॅलेन्ट सर्च परीक्षा पार पडली. शेकडो विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली.

Spontaneous response to the Talent Search exam | टॅलेंट सर्च परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

टॅलेंट सर्च परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद


गोंदिया : लोकमत व बालविकास मंच पेस आयआयटी एन्ड मेडीकल यांच्या संयुक्तवतीने रविवारी (ता.१३) येथील एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये टॅलेन्ट सर्च परीक्षा पार पडली. शेकडो विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली.
वर्ग ८, ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या या परिक्षेत बोर्डनिहाय स्वतंत्र प्रश्नपत्रीका देण्यात आली होती. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असल्याने एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी अनुभवला. यात शहरातील गोंदिया पब्लिक स्कूल, चंचलबेन हरिहरभाई पटेल हायस्कूल, शारदा कॉन्व्हेंट, सेंट झेवियर, राजस्थानी कन्या विद्यालय, एस.एस.गर्ल्स हायस्कूल, जे.एम. हायस्कूल, गुजराती स्कूल, साकेत पब्लिक स्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, गणेशन हायस्कूल, संस्कार कॉन्व्हेंट, विवेक मंदिर, सुकन्या हायस्कूल काटी येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
सदर परीक्षा वैकल्पीक तसेच ऋणात्मक गुण पद्धतीची असल्याने विद्यार्थ्यांनीही तेवढ्याच जाचक पद्धतीने प्रश्न सोडविले. स्पर्धा युगात आपण ही कसे या युगात सामोरे व्हायचे याची तयारी सुद्धा टॅलेन्ट सर्च परीक्षेच्या माध्यमाने पाहता आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to the Talent Search exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.