चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:38+5:302021-02-05T07:49:38+5:30
गोंदिया : श्री राष्ट्रीय राजपूत महिला संघटन तसेच महिला व युवा करणी सेनेच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ()
गोंदिया : श्री राष्ट्रीय राजपूत महिला संघटन तसेच महिला व युवा करणी सेनेच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३ ते ५ वर्षे व ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाणी वाचवा व पर्यावरण संरक्षण’ या विषयावर आधारित या स्पर्धेचे परीक्षण प्रकाश भैरव, वंदना खतवार, अमितसिंह चव्हाण यांना केले. स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी शीलू ठाकूर, करणी सेना महिला जिल्हाध्यक्ष पूजा बैस, इशिता सोलंकी, मीना ठाकूर, बबलू ठाकूर, अमित चव्हाण, अंशुल बडगुजर, राजेंद्र राजकुमार यांनी सहकार्य केले.