नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST2021-09-15T04:34:14+5:302021-09-15T04:34:14+5:30

बोंडगावदेवी : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सोमवार (दि.१३) आयोजित केलेल्या नेत्ररोग निदान शिबिराला गावातील तथा परिसरातील जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Spontaneous response to ophthalmology camp () | नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()

नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()

बोंडगावदेवी : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सोमवार (दि.१३) आयोजित केलेल्या नेत्ररोग निदान शिबिराला गावातील तथा परिसरातील जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये १३३ जणांनी नेत्र तपासणी केली.

स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० दिवसीय गणोशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देऊन आरोग्य विषयावर भर दिला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नेत्ररोग निदान शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रतिमा बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य डॉ. शामकांत नेवारे, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजू झोडे, देवलाल मानकर, डॉ. कुंदन कुलसुंगे, डॉ. वीर भांदलकर, डॉ. सौरभ हेडाऊ, डॉ. पी. एम. राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिबिरात १३३ लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. २८ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. ३६ जणांना मोतिबिंदू असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. ८ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली. शिबिरासाठी राजेश झोळे, डॉ. पुरुषोत्तम राऊत, प्रीतम वाढई, आनंद बोरकर, रवि बनपुरकर, योगेश बोरकर, राजू शेंडे, प्रतिमा राऊत, पवन साखरे, सारिका रंगारी, वर्षा रामटेके, रेखा शिखरामे यांनी सहकार्य केले.

Web Title: Spontaneous response to ophthalmology camp ()