शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावात जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 2:32 PM

नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी अर्जुनी मोरगावात आज कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत हा जनता कर्फ्यु 100% यशस्वी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी नगरात मंगळवार ते गुरुवार हे तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नगरपंचायततर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी आज कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत हा जनता कर्फ्यु 100% यशस्वी केला.बँका, शासकीय कार्यालये, औषधालये, रुग्णालये आणि डेअरी वगळता सर्वच आस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आल्या.सोमवारी नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली. सभेत स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्यापारी आस्थापना विषयी सविस्तर चर्चा करून मंगळवार ते गुरुवार तीन दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.शुक्रवारपासून व्यापारी आस्थापना सकाळी 9 ते 2 यावेळेत पुढील आदेशाप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.स्थानिक सिंगलटोली प्रभाग एक मध्ये रविवारी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी प्रभाग 1 व 2 कोअर झोन आणि 5 व 6 ला बफर झोन म्हणून घोषित केले आहे.नगरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि संसर्ग साखळी खंडित व्हावी म्हणून सोमवारीा नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली.सभेत स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्यापारी आस्थापना विषयी सविस्तर चर्चा करून मंगळवार ते गरुवार तीन दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस