शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची पोलिसांच्या वाहनाला धडक; एक ठार, दोन कर्मचारी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 21:40 IST

मासुकसा घाटाजवळील घटना

गोंदिया : देवरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर भरधाव ट्रकने राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या वाहनाला जबर धडक दिल्याने एक पोलिस कर्मचारी ठार झाल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. मनीष बहेलीया (३२) असे मृतक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

देवरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव कॅम्प डुग्गीपारचे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे, वाहन चालक योगेश बनोटे व मनीष बहेलीया हे मासुलकसा घाटाकडे पोलिस वाहनाने जात होते. दरम्यान, पाईप घेऊन जाणार ट्रॅकच्या (क्रमांक सीजी ०८-एके १४०२) चालकाने मद्याच्या धुंदीत भरधाव वेगात ट्रक चालवून महामार्ग वाहतूक पोलिसांच्या गाडीला (क्रमांक एमएच १२-आरटी ९६२५) जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनात मागे बसलेले पोलिस कर्मचारी मनीष बहेलीया (३२) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेसंदर्भात देवरी पोलिस गुन्हा दाखल केला आहे.

चार वाहनांना धडक; चालक होता मद्याच्या धुंदीत

मद्याच्या धुंदीत ट्रक चालक रायपूरकडून नागपूरकडे लोखंडी पाईप घेऊन जात होता. ट्रक चालकाने मद्याच्या धुंदीत चार वाहनांना धडक दिली. पोलिस वाहनाला धडक दिल्याने एक पोलिस ठार झाला. पोलिस वाहनानंतर एका ट्रॅव्हल्सला धडक दिली. ट्रॅव्हल्सच्या काचा फुटल्या. त्यानंतर स्काॅर्पिओ वाहनाला धडक दिली. शेवटी एका ट्रकला धडक दिली. या धडकेत चारही वाहनांचे नुकसान झाले. देवरी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू