‘स्पीडगन’ने रोखला ९७९८ वाहनांचा वेग (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:38+5:302021-02-05T07:48:38+5:30
गोंदिया : जलद वाहनांमुळे अपघात वाढतात. अपघातामुळे लाखो लोकांचा जीव जातो. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची गती मर्यादीत असावी अन्यथा वेगात ...

‘स्पीडगन’ने रोखला ९७९८ वाहनांचा वेग (डमी)
गोंदिया : जलद वाहनांमुळे अपघात वाढतात. अपघातामुळे लाखो लोकांचा जीव जातो. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची गती मर्यादीत असावी अन्यथा वेगात असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे स्पीडगन देण्यात आली आहे. या स्पीडगनने सन २०२० या वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ९,७९८ वाहनांच्या गतीवर आक्षेप घेऊन त्यांच्यावर ९८ लाख ८२ हजारांचा दंड करून त्या वाहन चालकांकडून वसूलही करण्यात आला आहे.
राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची गती अधिक असल्याने रस्त्याच्या मध्यात जनावरे, वन्यप्राणी किंवा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातून वाहन गेल्यास भरधाव वेगात असलेले वाहन नियंत्रणात आणता येत नाही. परिणामी अपघात होतात. या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहन मर्यादीत वेगातच चालविण्यात यावे, अशी जनजागृती वाहतूक पोलिसांकडून केली जाते. परंतु पोलिसांच्या त्या जनजागृतीकडे दुर्लक्ष करून वाहन चालकांकडून मर्यादीत वेगापेक्षा अधिक वेगात वाहन चालविले जाते. या जलद गतीने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश बसावा, यासाठी स्पीडगन तयार करण्यात आली आहे.
बॉक्स
जिल्हा पोलिसांना मिळणार मार्चपर्यंत स्पीडगन
गोंदिया जिल्हा पोलिसांकडे स्पीडगन नाही. महाराष्ट्रात गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांना स्पीडगन अद्याप मिळाली नाही. ती स्पीडगन मार्च २०२१पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मार्च २०२०मध्ये ही स्पीडगन मिळणार होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे स्पीडगन येऊ शकली नाही. परंतु येत्या दोन महिन्यांत स्पीडगन गोंदिया जिल्ह्याला मिळणार आहे.
कोट
जलदगतीने वाहन चालविणे हे वाहन चालकांसाठीच नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींसाठीही धोकादायक असते. वेगात असलेल्या वाहनांमुळे ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ ही अशी स्थिती होते. भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम स्पीडगन करते. मार्चपर्यंत गोंदिया पोलिसांना ही स्पीडगन मिळेल, अशी आशा आहे.
-दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया.
आराखडा
वर्षभरात केलेली कारवाई
जानेवारी- २९३४
फेब्रुवारी-२१११
मार्च-१७८५
एप्रिल-५७२९
मे-३९४९
जून-२९८२
जुलै- ४५४४
ऑगस्ट-३०६७
सप्टेंबर-२५०८
ऑक्टोंबर-३१३७
नोव्हेंबर-२२९३
डिसेंबर-२१८६