सट्टाबाजार तेजीत

By Admin | Updated: October 9, 2014 23:04 IST2014-10-09T23:04:49+5:302014-10-09T23:04:49+5:30

जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. सट्टाबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदियात आता निवडणूक काळात सट्टयÞाच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे.

Speculators fast | सट्टाबाजार तेजीत

सट्टाबाजार तेजीत

गोंदिया: जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. सट्टाबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदियात आता निवडणूक काळात सट्टयÞाच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. पोलिसांनाही ही बाब माहिती आहे. मात्र मोबाईलच्या माध्यमातून सट्टापट्टी उतरवून त्याची खायवाडी केली जात असल्याने पोलिसांना आजतागायत या सटोड्यांच्या मुसक्या आवळता आल्या नाही. त्यामुळे सटोड्यांपुढे पोलीसही हतबल असल्याचे दिसून येते.
आघाडी आणि युतीची ताटातूट झाल्याने सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके मतदारसंघ सोडले तर कुठेही अमका उमेदवार निवडून्न येईल, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. या परिस्थितीने मतदारच नव्हे तर निवडणुकीपूर्वी उमेदवाराच्या विजयाचे भाकीत करणारे सटोडेही कमालीचे संभ्रमात आहे. त्यामुळे अद्यापही त्यांच्याकडून कौल आण िसमीकरणांची जुळवाजुळव केली जात आहे. परिणामी अंतिम टप्प्यातच विजयाचा अंदाज येऊन सट्टयÞाचे दर उघडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
जनमताच्या कौलाचा अंदाज घेऊन आणि खासगी सर्व्हेच्या माध्यमातून प्रत्येकवेळी सटोडे विजयी उमेदवाराचे गणीत बांधतात. काही मतदार संघाचे अपवाद सोडले तर आजवर बहुतांश उमेदवारांबाबत त्यांनी मांडलेले भाकीत खरे ठरले आहे. विजयी उमेदवार, लढत, अनामत रक्कम वाचणार, जप्त होणार अशा विविध पैलूंनी सट्टा घेतला जातो. त्यानुसार त्याचे दरही निश्चित केले जातात. सटोड्यांनी मांडलेल्या भाकितानुसार विजयी होणार्?या
उमेदवाराचा दर नगण्य स्वरूपाचा असतो. एक रूपयाला पाच पैसे ते १० पैशांपर्यंत हा दर असतो. तर ८0 पैशांपासून ते एक रूपयांपर्यंत द्वितीय स्थानावर राहणाऱ्या उमेदवाराचा दर असतो.
लोकसभा आणि विधासभा निवडणूकीच्या कालावधीत तर सट्टयाला अक्षरश: उधाण येते. जिल्ह्यातील चजारही मतदारसंघात सट्टयÞाच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होते. सटोड्यांनी निवडणुकीपूर्वी मांडलेले विजयाचे भाकीत बहुतांश वेळी खरे ठरल्याने अनेकांच्या नजरा सट्टा बाजाराकडे लागून असतात. मात्र यावेळी प्रचार ऐनभरात आला असतानाही सटोड्यांना विजयी उमेदवारांचे भाकीत मांडता आले नाही. यावेळी नेमके काय समीकरण राहणार हे कळेनासे झाले.

Web Title: Speculators fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.