गोंदिया-संतरागाछी दरम्यान स्पेशल ट्रेन

By Admin | Updated: July 21, 2016 01:11 IST2016-07-21T01:11:41+5:302016-07-21T01:11:41+5:30

प्रवाशांची अत्यधिक ये-जा व सुट्ट्या लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे विशेष ट्रेन (०८०४३) संतरागाछी-गोंदिया..

Special train between Gondiya-Santaragachi | गोंदिया-संतरागाछी दरम्यान स्पेशल ट्रेन

गोंदिया-संतरागाछी दरम्यान स्पेशल ट्रेन

 गोंदिया : प्रवाशांची अत्यधिक ये-जा व सुट्ट्या लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे विशेष ट्रेन (०८०४३) संतरागाछी-गोंदिया स्पेशल ३ आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.
ही गाडी संतरागाछीवरून दर सोमवारी दुपारी २.५० वाजता सुटेल तर मंगळवारी सकाळी ६.०५ वाजता गोंदियात पोहोचेल. तसेच ट्रेन (०८०४४) गोंदिया-संतरागाछी स्पेशल ४ आॅक्टोबर ते २९ आॅक्टोबर २०१६ पर्यंत गोंदियावरून दर मंगळवारी १२.४० वाजता सुटेल व बुधवारी सकाळी ६.१० वाजता संतरागाछी पोहोचेल.
या गाडीत एकूण १८ कोच राहतील. यात १० तृतीय श्रेणी वाताणुकूलीत, सहा द्वितीय श्रेणी वाताणुकूलीत व दोन एसएलआर कोच राहतील. ही ट्रेन खडकपूर, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग व राजनांदगाव स्थानकांवर थांबेल. तसेच संतरागाछी ते पुणेच्या दरम्यानसुद्धा ८ आॅक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. ट्रेन (०२८२२) संतरागाछीवरून दर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल व सोमवारी पहाटे २.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. तसेच ट्रेन (०२८२१) पुणे-संतरागाछी स्पेशल १० आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत पुणेवरून प्रत्येक सोमवारी सकाळी १०.३० वाजता सुटेल व मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता संतरागाछी येथे पोहोचेल.
गाडीचा (०२८२२) नागपूर येथे आगमन/प्रस्थान ११.१५/११.२५ वाजता (रविवार) तथा गाडीचा (०२८२१) नागपूर येथे आगमन/प्रस्थान १.२०/१.३० वाजता (मंगळवार) राहील. या गाडीत एकूण १३ कोच राहतील. यात आठ तृतीय श्रेणी वाताणुकूलित, तीन द्वितीय श्रेणी वाताणुकूलित व दोन एसएलआर कोचचा समावेश राहणार आहे.
ही गाडी खडकपूर, चक्रधरपूर, राहुरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, भुसावळ व सूरत आदी स्थानकावर थांबेल, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Special train between Gondiya-Santaragachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.