नवेगाव-नागझिरा प्रकल्पात प्रवेशाकरिता विशेष सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:57+5:302021-02-05T07:50:57+5:30
गोंदिया : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुढील पंधरवड्यात पर्यटनाचा लाभ जास्तीत जास्त निसर्गप्रेमींना व्हावा याकरिता नवेगाव-नागझिरा व्याघ्र ...

नवेगाव-नागझिरा प्रकल्पात प्रवेशाकरिता विशेष सूट
गोंदिया : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुढील पंधरवड्यात पर्यटनाचा लाभ जास्तीत जास्त निसर्गप्रेमींना व्हावा याकरिता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव ब्लॉकमधील खोली, बकी, जांभळी व पितांबरटोला या प्रवेशद्वारावरून प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना विशेष सवलत देण्यात येत आहे.
२६ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत ही विशेष सूट दिली जाणार असून ज्या पर्यटकांनी या कालावधीदरम्यान नवेगाव ब्लॉकमधील खोली, बकी, जांभळी व पितांबरटोला या प्रवेशव्दारावरून ऑनलाइन बुकिंग केलेली असेल त्यांचे प्रवेश व वाहन फीची ५० टक्के रक्कम परत करण्यात येईल. म्हणजेच, प्रवेश फी १०० रुपयांऐवजी ५० रुपये व वाहन फी ३०० रुपयांऐवजी १५० राहणार आहे. सर्व निसर्गप्रेमी व पर्यटकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे विभागीय वन अधिकारी व्ही. के. बोऱ्हाडे यांनी कळविले आहे.