शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काम करताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू, वडील जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 15:54 IST

तरुण मुलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने बागळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

गोरेगाव (गोंदिया) : शेतात रोवणीचे काम करीत असताना अंगावर वीज कोसळल्याने मुलाचा मृत्यू झाला, तर वडील जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सलंगटोला (मुंडीपार) येथे सोमवारी (दि. ११) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. कुणाल लक्ष्मण बागळे (२१) असे मृत मुलाचे, तर लक्ष्मण बागळे असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे.

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील रोवणीचे काम सुरू आहे. लक्ष्मण बागळे कुटुंबीयांसह सोमवारी त्यांच्या शेतात रोवणीचे काम करीत होते. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, कुणालच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण बागळे जखमी झाले. शेतालगत काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तरुण मुलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने बागळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिरोडा तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पाचे ५ दरवाजे ०.५० सेमीने उघडण्यात आले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीgondiya-acगोंदियाRainपाऊस