गावातील विविध समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:53+5:302021-08-18T04:34:53+5:30

बोंडगाव देवी : येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावातील विविध समस्या मार्गी लागून गावविकासाला गती मिळावी यासाठी प्रफुल्ल पटेल यांना निवेदन ...

Solve various problems in the village | गावातील विविध समस्या सोडवा

गावातील विविध समस्या सोडवा

बोंडगाव देवी : येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावातील विविध समस्या मार्गी लागून गावविकासाला गती मिळावी यासाठी प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात, नळ योजनेची जुनी पाइपलाइन खराब झाल्याने वाढीव पाइपलाइन मंजूर करावी, प्रभाग क्रमांक-४ मध्ये ५० हजार लीटर क्षमतेची पूरक नळ योजना कार्यान्वित करावी, ग्राम सचिवालयाची इमारत मंजूर करावी, सौरऊर्जेचा प्लांट कार्यान्वित करावा आदी मागण्या नमूद आहेत. या मागण्यांचे निवेदन खासदार प्रफुल्ल पटेल यांना माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत सरपंच प्रतिमा बोरकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ. श्यामकांत नेवारे, अमरचंद ठवरे, ॲड. श्रीकांत बनपूरकर, माया मेश्राम, निराशा मेश्राम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने दिले. यावर बोंडगाव देवी हे प्रसिद्ध तीर्थस्थळ असल्याने गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन खा. पटेल यांनी ग्रामपंचायतच्या शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Solve various problems in the village