शिक्षकांच्या विविध समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST2021-03-27T04:29:59+5:302021-03-27T04:29:59+5:30
वडेगाव : शिक्षकांच्या प्रलंबीत असलेल्या विविध समस्या निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी करीत शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी ...

शिक्षकांच्या विविध समस्या निकाली काढा
वडेगाव : शिक्षकांच्या प्रलंबीत असलेल्या विविध समस्या निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी करीत शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी यांची भेट घेऊन चर्चा करीत त्यांना निवेदन देण्यात आले.
चर्चेत अपघात विमा ३५४ रुपयांची नामनिर्देशनाची नोंद शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत करावी व यासाठी सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून सूचित करावे, ७व्या वेतन आयोगानुसार मंजूर झालेली वेतनश्रेणी व वेतनाची सेवापुस्तिकेतील नोंद मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी, तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांच्या दुय्यम सेवापुस्तिका बनविण्यासाठी-अद्ययावत करण्यासाठी केंद्र व शाळानिहाय शिबिर घेण्यात यावे, सेवेची १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांनी चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव सादर केले असल्यास, पुढील कार्यवाहीसाठी त्वरित पाठविण्यात यावे, तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षण सेवकांच्या सेवापुस्तिका तयार करण्यात याव्यात, हिंदी- मराठी भाषा परीक्षा सूट मिळण्यासाठी ज्या शिक्षकांचे प्रस्ताव सादर केले असल्यास ते त्वरित पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावे, जानेवारी, २००६ मध्ये नियुक्त शिक्षकांची ६व्या वेतन आयोगानुसार जानेवारी ते मार्च, २००९ची थकबाकी प्रदान करावी. डीसीपीएसधारक कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याचे १० टक्के कपात न करता बिल प्रदान करावे, ७व्या वेतन आयोगानुसार विकल्प निवडणे, वैद्यकीय बिल रक्कम उपलब्ध होताच प्रदान करणे, गटविमा, नवा व जुना डीसीपीएस क्रमांक इत्यादी सेवा पुस्तिकेत नोंद घेणे हे सर्व मुद्दे मांडून निवेदन देण्यात आले. यावर गटशिक्षणाधिकारी पारधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिक्षकांचे कोणतेही प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहणार नाही, याची ग्वाही दिली. लवकरच दुय्यम सेवापुस्तिका तयार करण्यासाठी केंद्रानिहाय शिबिर लावले जाणार आहे. कोणत्याही शिक्षकाचे काम प्रलंबित राहणार नाही, याकरिता वरिष्ठ लिपिक मडावी यांना निर्देशित केले. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष पारधी, सचिव परमानंद रहांगडाले, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, सल्लागार हितेश रहांगडाले, मार्गदशक संजय रहांगडाले, मानकर, महिला प्रमुख प्रतिमा खोब्रागडे, महिला संघटक शिल्पा रंगारी, योगिता पारधी, महिला सचिव शीला खरवडे उपस्थित होते.