शिक्षकांच्या समस्या तत्काळ सोडवा
By Admin | Updated: November 7, 2015 01:48 IST2015-11-07T01:48:23+5:302015-11-07T01:48:23+5:30
पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा आंदोलन करू,...

शिक्षकांच्या समस्या तत्काळ सोडवा
शिक्षक संघाची मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा
साकोली : पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा साकोलीतर्फे खंडविकास अधिकारी डॉ. मोकाशी यांना शिक्षक सहकारी पतसंस्था साकोलीचे शाखाध्यक्ष राकेश चिचामे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार, सहाव्या वेतन आयोग हप्त्याची नोंद सेवापुस्तिकेत करण्यात यावी. बारावर्षे सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लावण्यात यावे, २४ वर्षे सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी प्रशिक्षणास पाठविणे, निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची सेवा पुस्तिकेला नोंद घेण्यात यावी, वैद्यकीय बिल निकाली काढण्यात यावे, अर्जीत रजा, वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावे, एकस्तर वेतनश्रेणी लावणे, सर्वशिक्षक अभियानांतर्गत मिळणारे अनुदान व शालेय पोषण अनुदान मुख्याध्यापक खात्यात त्वरीत जमा करण्यात यावे व पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्त शिक्षकांना श्रेणी ४ हजार ३०० रूपये लागू करण्यासाठी जिल्हा परिषदेला पाठपुरावा करण्यात यावा, अशा मागण्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळात शाखाध्यक्ष राकेश चिचामे, विजय वाघाडे, राजेश सुर्यवंशी, से.र. हटवार, संजय खंडाईत, संजय नंदेश्वर, शिवकुमार भगत, बाळु कापगते, अनिल खंडाईत, योगेश बोरकर, वासुदेव गोंधळे, बी.एम. फुलबांधे, रवी मस्के उपस्थित होते. शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा साकोलीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)