राजाभोज कॉलनीतील समस्या मार्गी लावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:45+5:302021-02-08T04:25:45+5:30
गोंदिया : शहरातील रिंग रोड परिसरातील राजाभोज कॉलनी परिसराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, येथील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. ...

राजाभोज कॉलनीतील समस्या मार्गी लावा ()
गोंदिया : शहरातील रिंग रोड परिसरातील राजाभोज कॉलनी परिसराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, येथील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. या परिसरातील समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी कॉलनीवासीयांनी केली असून आमदार विनोद अग्रवाल यांना निवेदन दिले आहे.
शहरातील शहीद भगतसिंग वॉर्ड राजाभोज कॉलनीत सुमारे ४००-५०० घरांची वस्ती आहे. कॉलनीतील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी एकच मुख्य मार्ग आहे व सध्या त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची गरज आहे. तसेच मार्गावर एक लहान पूल असून तो जीर्ण झाला असून कोसळून मोठा अपघात घडू शकतो. अशात या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, कॉलनीत एकच वीज ट्रान्सफार्मर असल्यामुळे विजेचा दाब कमी असतो. परिणामी, घरातील बोअरवेल काम करत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची समस्या भेडसावते. येथे दुसऱ्या ट्रॉन्सफार्मरची व्यवस्था करण्यात यावी. परिसरात रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे पथदिवे बसविण्यात यावे, अशी मागणी कॉलनीवासीयांनी केले आहे.
या मागण्यांकरिता मागील ३ वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. करिता कॉलनीवासीयांनी या समस्यांना घेऊन आमदार अग्रवाल यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले. निवेदन देताना ओमप्रकाश बिसेन, गणेश बिसेन, अमित मंडल, टिकेश बोपचे, प्रवीण मुजारिया, रोशन भानारकर, दिनेश रहांगडाले, लोकचंद बिसेन, लोकेश कटरे, अशोक टईकर, महेंद्र ठाकरे, नीरज पारधी, विलास टेंभरे, डिलेश्वर मेंढे, क्रिष्णकुमार जामरे, तुलशीदास कटरे आदी उपस्थित होते.