भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडवा
By Admin | Updated: August 28, 2016 01:06 IST2016-08-28T01:06:42+5:302016-08-28T01:06:42+5:30
शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या मांग गारुडी

भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडवा
राजकुमार बडोले : आढावा बैठकीत दिले निर्देश
गोंदिया : शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या मांग गारुडी, बहुरु पी, नाथजोगी व भिंगी या भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न संबंधित जिल्हा प्रशासनाने तातडीने सोडवावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
बुधवारी (दि.२४) नवेगावबांध येथील लॉगहट विश्रामगृह येथे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भटक्या समाजातील नागरिकांच्या समस्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भंडारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे प्रामुख्याने उपस्थित होत्या. पुढे बोलताना बडोले यांनी, भटक्या समाजाला कुठेतरी स्थायी केले पाहिजे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करु न दिल्या पाहिजे. या समाजातील महिलांना वसंतराव नाईक महामंडळामार्फत गृह उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करावे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न देखील मार्गी लावले पाहिजे असे सांगीतले.
तर पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व कोतवाल यांचा स्थानिक चौकशी अहवाल प्राप्त करु न त्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यात यावा असे सांगून बडोले यांनी, हा भटका समाज घरे नसल्यामुळे कापडी पालाचे घरे तयार करु न राहतो. त्यांच्या पालावरच्या शाळा अंतर्गत पालावर जावून विद्यार्थ्यांना दोन तास शिकविण्यात यावे. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करु न देण्यात येईल. तसेच त्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत सौर कंदील दिले पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच त्यांच्या वन जमिनीच्या पट्टयांबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारार्ऱ्यांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी, शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या समाजाच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील असे सांगीतले. तर भंडारा जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी, या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करु न त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.
या बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, सिध्दार्थ भंडारे, के.डी.मेश्राम, मोहन टोनगावकर, तहसीलदार अरविंद हिंगे, रविंद्र चव्हाण, साहेबराव राठोड, कल्याण डहाट, प्रशांत सांगडे, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, भंडारा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, शिल्पा सोनाळे, दिलीप तलमले, तहसीलदार संजय पवार व राजीव शक्करवार यांच्यासह अन्य तहसीलदार उपस्थित होते.
यावेळी गोंदिया समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, भंडारा समाज कल्याणचे सहायक आयुक्त देवसूदन धारगावे, वसंतराव नाईक महामंडळाचे अधिकारी, भटक्या जमाती संघटनेचे अध्यक्ष चव्हाण उपस्थित होते.
प्रास्ताविक दिलीप चित्रीवेकर यांनी मांडले. आभार शिवा कांबळे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)